मुकेश अंबानी मुलाच्या लग्नात जस्टिन बीबरला 83 कोटी तर, बादशाहला किती पैसे देणार?

मुकेश अंबानी मुलाच्या लग्नात जस्टिन बीबरला 83 कोटी तर, बादशाहला किती पैसे देणार?

भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. आता देखील एका मोठ्या कारणामुळे अंबानी कुटुंब चर्चेत आहे. 12 जुलै रोजी मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न होणार आहे. अनंत – राधिका यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना देखील सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हॉलिवूड गायक जस्टिन बीबर संगीत सोहळ्यात गाणार आहे. रिपोर्टनुसार, लग्नात परफॉर्म करण्यासाठी जस्टिन बिबर याने तब्बल 10 मिलियन डॉलर म्हणजे 83 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

सांगायचं झालं तर, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशसाठी हॉलिवूड सिंगर रिहाना हिला बोलावण्यात आलं होतं. ज्यासाठी मुकेश अंबानी यांनी तिला 74 कोटी रुपये दिले होते. तेव्हा रिहाना हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता सर्वत्र भारतात दाखल झालेल्या जस्टिन बीबर याची चर्चा रंगली आहे. जस्टिन बीबर याच्या चाहत्यांची संख्या भारतात देखील फार मोठी आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

 

जस्टिन बीबर याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 20 व्या वर्षी जस्टिन बीबर याने 4 हजार कोटी रुपयांच्या संपत्ती कमवली आहे. जस्टिन बीबर कॉन्सर्टच्या माध्यमातून वर्षाला जवळपास 500 कोटी रुपयांचा कमाई करतो. जस्टिन बीबर याची कामाईचं मुख्य माध्यम कॉन्सर्टच आहे. जस्टिन बीबर याच्या एका कॉन्सर्चची फी 20 कोटी रुपये आहे. आता सर्वांचं लक्ष अनंद अंबानी यांच्या लग्नात होणाऱ्या जस्टिन बीबर याच्या कॉन्सर्टकडे आहे.

बादशाह देखील करणार परफॉर्म

अँटेलिया हाऊसमध्ये होणाऱ्या संगीत सोहळ्यात बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह देखील गाणार आहे. रिपोर्टनुसार, बादशाह एका गाण्यासाठी 20 लाख रुपये मानधन घेतो. त्यामुळे मुकेश अंबानी, बादशाहला संगीत सोहळ्यात गाण्यासाठी किती मानधन देणार अद्याप समोर आलेलं नाही. बादशाह याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, रॅपरकडे 30 कोटी रुपयांची संपत्ती आहे. रिपोर्टनुसार, प्रत्येक वर्षा बादशाहच्या संपत्तीत 1 मिलियनने वाढ होते.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. आता लग्नात कोण – कोण उपस्थित राहाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;