Rohit Sharma: कपूर कुटुंबाच्या ‘या’ मुलीवर फिदा होता रोहित शर्मा, जाणून व्हाल हैराण

Rohit Sharma: कपूर कुटुंबाच्या ‘या’ मुलीवर फिदा होता रोहित शर्मा, जाणून व्हाल हैराण

वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियाचं मायदेशी जंगी स्वागत करण्यात आलं. वानखेडे स्टेडियमपर्यंत जाताना चाहते आणि टीममधील खेळाडू सर्वांनी विजयी रॅलीमध्ये आनंद घेतला. कालचा (गुरुवार) दिवस भारतीयांसाठी फार मोठी होता. कप जिंकल्यावर भारतात परत आलेल्या क्रिकेटपटूंची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. क्रिकेटपटूंच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. सांगायचं झालं तर, क्रिकेटविश्व आणि बॉलिवूडचं फार जवळचं नातं आहे. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींचे क्रिकेटपटूंसोबत असलेले लव्ह ऍन्गल आजही चर्चेत आहेत. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींना डेट केलं आहे, पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचंल नाही.

आज अभिनेत्री आणि क्रिकेटर त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. पण तरी देखील रिलेशनशिपच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. सध्या चर्चा रंगत आहेत कॅप्टन रोहित शर्मा याची खासगी आयुष्याची… रोहित शर्मा आज पत्नी आणि मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा रोहित शर्मा एका बॉलिवूड अभिनेत्रीवर फिदा होता. याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने केला आहे.

2014 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रोहित शर्मा याने बॉलिवूडसोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं आहे. रोहित शर्मा म्हणाला होता, ‘मी मधुबाला, वहीदा रहमान, किशोर कुमार, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचे सिनेमा पाहात मोठा झालो आहे.’ यावेळी रोहित याला आवडती अभिनेत्री कोण असा प्रश्न देखील विचारण्यात आला. तेव्हा रोहित याने अभिनेत्री करीना कपूर हिचं नाव घेतलं.

करीना कपूर हिच्याबद्दल रोहित म्हणाला, ‘मला करीना कपूर आवडते. मी तिच्यासाठी वेडा होतो. मी तिचा प्रत्येक सिनेमा पाहिला आहे. तेव्हा करीना माझी क्रश होती..’ असं देखील रोहित शर्मा म्हणाला होता. रोहित बद्दल ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे.

रोहित शर्मा आणि पत्नी ऋतिका सचदेह

रोहित शर्मा आणि ऋतिका यांनी 2015 मध्ये लग्न केलं. 6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांना लग्न करण्याचा निर्यण घेतला. रोहित शर्मा आणि पत्नी ऋतिका सचदेह यांना एक मुलगी देखील आहे. रोहित याचे मुलीसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रोहित शर्मा याची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;