कंपनीच्या पैशांनी राजेशाही लग्न केले, मग हनीमून साजरा केला; तरुणाचा कारनामा उघड होताच पोलीसही चक्रावले!

कंपनीच्या पैशांनी राजेशाही लग्न केले, मग हनीमून साजरा केला; तरुणाचा कारनामा उघड होताच पोलीसही चक्रावले!

खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने कंपनीच्या निधीवर डल्ला मारत तब्बल 10 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. तो पैसा स्वतःचे राजेशाही लग्न, हनिमून आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरला. इतकेच नव्हे तर आपल्या नातेवाईकांच्या खात्यातही पैसे वळते केले. काही पैशांचा शेअर्सच्या विक्रीसाठी वापर केला. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याला अटक करून दाखल केलेल्या आरोपपत्रात तरुणाच्या या धक्कादायक कारनाम्यांचा उल्लेख केला आहे. हा सर्व गैरव्यवहार उघडकीस येताच पोलिसही चक्रावून गेले आहेत.

राज मुकेश गणात्रा हा 32 वर्षीय तरुण ट्रायडेन्ट क्रिएशन कंपनीत सिनिअर कर्मचारी होता. त्याने कंपनीच्या पैशाचा गोलमाल करून दोन मोठ्या रक्कमेची कर्जे फेडली. त्यापैकी 30 लाखांचे कर्ज क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावण्यासाठी घेतले होते. याशिवाय दुसऱ्या 10 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड केली.

विशेष म्हणजे, स्वतःच्या राजेशाही लग्नावर तब्बल 16 लाख रुपये तसेच नववधूला हनिमूनला नेण्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च केले होते. हा सर्व खर्च कंपनीच्या पैशांच्या गैरव्यवहारातून केल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. तसेच 15 लाख रुपये शेअर्स आणि मुचूअल फंडामध्ये गुंतवल्याचे उघडकीस आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;