माँ माली…बाप तेली… बेटे निकले सय्यद अली…मनसेच्या प्रकाश महाजनांची जीभ घसरली

माँ माली…बाप तेली… बेटे निकले सय्यद अली…मनसेच्या प्रकाश महाजनांची जीभ घसरली

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मनसे नेते प्रकाश महाजन यांची जीभ घसरली. राहुल गांधी यांचा हिंदू धर्माशी काय संबंध? मा माली…बाप तेली…बेटे निकले सय्यद अली…अशी त्यांची अवस्था असल्याचे वादग्रस्त विधान महाजन यांनी केले. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर माळी आणि तेली समाजात संतापाची लाट उसळली असून प्रकाश महाजन यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.

राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यावर अनिर्बंध बोलू लागले आहेत. हिंदू हे हिंसक असतात असं जनरल स्टेटमेंट त्यांनी केले. त्यांचा आमच्या हिंदू धर्माशी काय संबंध? नाही ते बापाकडून हिंदू, नाही आईकडून हिंदू तरी ते हिंदूवर कसे बोलतात. त्यांच दत्तात्रय गोत्र कुठून आलं. ग्रामीण भागात म्हण आहे आई एका जातीची बाप एका जातीचा आणि अवलाद दुसऱयाच जातीची जन्माला आली. माली…बाप तेली…बेटे निकले सय्यद अली…अशातला तो प्रकार आहे, असे वादग्रस्त विधान प्रकाश महाजन यांनी राहुल गांधींवर टीका करताना केले. बृहन्महाराष्ट्र तेली व माळी समाजाने महाजन यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी तेली व माळी समाजाची माफी मागावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष विलास वाव्हळ यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;