तंटा नाय तर घंटा नाय… ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो आऊट; रितेश देशमुखच्या स्टाईलने मनं जिंकली

तंटा नाय तर घंटा नाय… ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो आऊट; रितेश देशमुखच्या स्टाईलने मनं जिंकली

‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचे असंख्य चाहते आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’ चा नवा कोरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कलर्स मराठी’ आणि जिओ सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ‘बिग बॉस मराठी’ च्या नव्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी’चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी’ चा नवा प्रोमो समोर आला आहे. या नव्या प्रोमोमध्ये या कार्यक्रमाचा होस्ट अभिनेता रितेश देशमुखचा ‘वेड’ लावणारा अंदाज पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना रितेशचा नवा अंदाज भावतो आहे.

‘बिग बॉस मराठी’ चा नवा प्रोमो

‘बिग बॉस मराठी’च्या याआधीच्या प्रोमोतून रितेश भाऊमुळे ‘बिग बॉस’ आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. अशातच आता पुन्हा एकदा नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता बिग बॅासच्या किचनमध्ये भांड्याला भांडं लागणार… आणि रितेश देशमुखच्या स्टाईलने सिझन गाजणार…, असं म्हणत ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सिझनचा प्रोमो कलर्स मराठीकडून शेअर करण्यात आला आहे. हिंदी- मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा सीझन वाजवायला सज्ज आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @colorsmarathi

‘बिग बॉस मराठी’ च्या पहिल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊची ‘लयभारी’ स्टाईल पाहायला मिळाली. अन् आता नव्या प्रोमोमध्येही त्याचा कमाल स्वॅग पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आतापर्यंत ज्या पद्धतीने गेम प्लॅन, टास्क स्पर्धक खेळले. त्याप्रकारे या पर्वातील स्पर्धकांना खेळता येणार नाही. कारण स्पर्धकांचे प्लॅन तोडायला रितेश भाऊ सज्ज आहे. ‘तंटा नाय तर घंटा नाय… ते प्लॅन बनवणार आणि मी तोडणार.. कारण आता मी आलोय कल्ला तर होणारच… तो पण माझ्या स्टाईलने, असं या प्रोमो रितेश देशमुख म्हणताना दिसत आहे.

बिग बॉस मराठीचा नवा सिझन लवकरच…

महाराष्ट्रात लवकरच ‘बिग बॉस’ चा आवाज घुमणार आहे. आगळावेगळा भन्नाट रिअॅलिटी शो म्हणून ”बिग बॉस’कडे पाहिलं जातं. हा कार्यक्रम जेवढा मनोरंजक आहे. तेवढाच आव्हानात्मक आहे. या पर्वातही एकापेक्षा एक अतरंगी स्पर्धक अशक्य, अफलातून गोष्टी करताना दिसून येतील. तसेच रितेश देशमुख आपल्या अनोख्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस’ मराठीचा नवा सीझन प्रेक्षकांना लवकरच कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावर पाहता येईल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;