प्रेग्नंसीमुळेच सोनाक्षी सिन्हाने केले घाईत लग्न? अत्यंत मोठा खुलासा, जवळच्या…

प्रेग्नंसीमुळेच सोनाक्षी सिन्हाने केले घाईत लग्न? अत्यंत मोठा खुलासा, जवळच्या…

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा ही आपल्या लग्नात धमाल करताना दिसली. लग्नानंतर खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नाला बॉलिवूडचे अनेक कलाकार पोहोचले होते. सिन्हा कुटुंबियांचा या लग्नाला विरोध असल्याचे सातत्याने सांगितले गेले. मात्र, सही करताना सोनाक्षी हिने वडिलांचा हात पकडल्याचे अनेक फोटोंंमध्ये बघायला मिळाले.

सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही वर्षांपासून झहीर इक्बाल याला डेट करत होती. शेवटी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्न होऊन पाच दिवसांनंतरच सोनाक्षी सिन्हा ही रूग्णालयात दाखल झाली. यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. अनेकांनी म्हटले की, आलिया भट्ट हिच्याप्रमाणेच लग्नाच्या अगोदरच सोनाक्षी सिन्हा ही देखील प्रेग्नंट होती.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर एका यूजरने लिहिले की, सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट आहे. त्यामध्ये लिहिण्यात आले की, माझ्या दोन बॉलिवूड सूत्रांच्या माहितीनुसार सोनाक्षी सिन्हा ही प्रेग्नंट असून लवकरच ती आपल्या प्रेग्नंसीची घोषणा देखील करेल. वडील शत्रुघ्न सिन्हा यांची तब्येत खराब असताना देखील सोनाक्षी सिन्हाने झहीरसोबत घाईमध्ये लग्न केले, कारण ती प्रेग्नंट होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

मात्र, त्यानंतर स्पष्ट झाले की, सोनाक्षी सिन्हा ही वडिलांना पाहण्यासाठीच रूग्णालयात पोहोचली होती. मात्र, असे असतानाही देखील सतत सोनाक्षी सिन्हा ही प्रेग्नंट असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट असल्याचा दावा सातत्याने केला जातोय. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात तिचे दोन्ही भाऊ नाराज असल्याची चर्चा आहे. हेच नाहीतर लग्नात लव आणि कुश हे भावाचे कर्तव्य पार पाडताना दिसले नाहीत.

नुकताच सोनाक्षी सिन्हा हिचा भाई लव सिन्हा याने सोनाक्षीच्या लग्नाबद्दल मोठे भाष्य केले, हेच नाहीतर त्याने काही खुलासे देखील केली आहेत. लव सिन्हा याने थेट म्हटले की, मला माझे कुटुंबिय सर्वात अगोदर आहेत. माझ्या कुटुंबाच्या पुढे मला काहीच मोठे नाहीये. मी तिथे का नाही वगैरे याच्याबद्दल विविध चर्चा सुरू आहेत,असेही लव सिन्हा याने म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;