सुझान खानच्या लग्नाबद्दल अखेर तिच्या आईने केला मोठा खुलासा, हृतिक रोशनची एक्स पत्नी 48 व्या वर्षी…

सुझान खानच्या लग्नाबद्दल अखेर तिच्या आईने केला मोठा खुलासा, हृतिक रोशनची एक्स पत्नी 48 व्या वर्षी…

हृतिक रोशन याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. हृतिक रोशन त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. हृतिक रोशन हा गेल्या काही वर्षांपासून सबा आझाद हिला डेट करतोय. हृतिक रोशन आणि सबा नेहमीच एकसोबत स्पॉट होताना देखील दिसतात. दुसरीकडे हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझान खान ही देखील अर्सलान गोनी याला डेट करतंय. मध्यंतरी चर्चा होती की, अर्सलान गोनी आणि सुझान खान हे लवकरच लग्न करणार आहेत. सतत यांच्या लग्नाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

नुकताच सुझान खानच्या आईने लेकीच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय. हेच नाही तर तिने अर्सलान गोनी याच्याबद्दलही भाष्य केले आहे. सुझान खानच्या आईला विचारण्यात आले की, सुझान अर्सलान गोनीसोबत लग्न करणार आहे का? सुझान खानची आई जरीन म्हणाली की, जर आज तुम्हाला कोणासोबत आनंद मिळत आहे तर तुम्ही खूप जास्त भाग्यशाली नक्कीच आहात.

मुळात म्हणजे कोणालाही माहिती नसते की, भविष्यात काय होणार ते. गेल्या अनेक वर्षांपासून हेच चालत आले आहे. आज आयुष्यात लग्न हेच महत्वाचे नाहीये. हॉलिवूड स्टार गोल्डी हॉन आणि कट रसेल गेल्या कित्येक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि विशेष म्हणजे ते दोघे एकमेकांसोबत खुशही आहेत. पुढे सुझानची आई म्हणाली की, अर्सलान गोनी याने कायद्याचे शिक्षण घेतले आहे.

हेच नाही तर अर्सलान गोनी हा जम्मूच्या एका प्रतिष्ठित राजकिय घराण्याशी संबंधित आहे. त्याला अभिनय क्षेत्रामध्ये रस आहे. मला या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे की, ते दोघे एकमेकांसोबत खूप जास्त खुश आहेत. अर्सलान गोनीचे कुटुंबिय खूप चांगले आहेत. थोडक्यात काय तर सुझान खानच्या आईने स्पष्ट केले की, लग्न हेच सर्वकाही नाहीये. दोघे एकमेकांसोबत आनंदी असल्याचे म्हटले.

म्हणजेच काय तर अर्सलान गोनी आणि सुझान खान हे लग्न करणार नाहीत. सुझान खान आणि हृतिक रोशन यांनी लग्नाच्या 13 वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. हृतिक रोशन आणि सुझान यांना दोन मुले देखील आहेत. हृतिक रोशन हा सबा आझादसोबत लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. मात्र, हृतिक रोशन यानेही त्याच्या लग्नाबद्दल काहीच भाष्य केले नाहीये.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;