Ratnagiri crime news : रेल्वे चोरीतील 18 तोळे सोन्यापैकी 13 तोळे सोने हस्तगत करण्यात शहर पोलिसांना यश

Ratnagiri crime news : रेल्वे चोरीतील 18 तोळे सोन्यापैकी 13 तोळे सोने हस्तगत करण्यात शहर पोलिसांना यश

रेल्वेतून प्रवास करताना चोरट्याने बॅग आणि 18 तोळे सोने लंपास केले होते. त्या चोरट्याला रत्नागिरी शहर पोलिसांनी मडगाव येथे अटक केली. त्याच्याकडून 18 तोळे सोन्यापैकी 13 तोळे सोने पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई शहर पोलिसांतील गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पोलिसांनी केली.

अन्नमा जोसफ (वय – 56, रा. केरळ, सध्या रा. डोंबिवली) हे केरळ ते मुंबई प्रवास करत होते. त्यांना कोकण रेल्वे मार्गावरिल आडवली ते रत्नागिरी दरम्यान झोप लागली. त्याचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांची बॅग व 18 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. जोसेफ यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर एक महिन्यानंतर पोलिसांनी चोरट्याला पकडले. प्रसाद जगन्नाथ पाटील (वय – 30, रा. भेरसे, अलिबाग, रायगड) असे चोरट्याचे नाव आहे.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा वापर केला. तो कुठे कसा गेला याचा ट्रेस सुरु असताना एका एटीएममध्ये पैसे काढत असताना त्याचा पूर्ण चेहरा समोर आला. त्यानंतर शहर पोलिसांनी शुक्रवारी 28 जून रोजी पहाटे मडगाव येथून त्याला अटक केली होती. प्रसादला अटक केलानंतर त्याने चोरलेले सोने कुठे नेले याचा तपास करताना ते सोने अलिबाग येथील अरुण जनबा घोटणे याला विकल्याची माहिती पुढे आली . त्यानंतर पोलिसांनी अरुण घोटणे यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून 18 तोळे पैकी 13 तोळे सोने जप्त करण्यात यश मिळवले.

अनेकदा रेल्वेमधील चोऱ्या उघडकीस येत नाहीत. चोरी एकीकडे होते तर त्याची तक्रार दुसर्या गावातील पोलीस स्थानकात होते. रेल्वे प्रवास दरम्यान चोरट्याचा माग काढणे सोपे नसते. मात्र रत्नागिरी शहर पोलीस स्थानकातील गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पोलिसांनी कमाल करत हो चोरी उघडकीस आणलीच परंतु दोन मुख्य संशयिताना जेरबंद करतानाच मुद्देमाल सुद्धा जप्त केला.

ही कामगिरी शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक श्याम आरमळकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक दिपक साळवी, पोलीस हवालदार अरुण चाळके, राहुल जाधव, अमोल भोसले, पोलीस नाईक पंकज पडेलकर, आशिष भालेकर, भालचंद्र मयेकर पोलीस शिपाई अमित पालवे यांनी केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्याम आरमळकर करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;