‘क्रिश’मध्ये लहानपणीच्या हृतिकची भूमिका साकारणारा मुलगा आठवतोय का? आता बनला डॉक्टर
हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'क्रिश' या चित्रपटात हृतिकच्या लहानपणीची भूमिका साकारलेला मुलगा आठवतोय का? या चित्रपटात बालकलाकार मिकी धामिजानीने लहानपणीच्या हृतिकची भूमिका साकारली होती. आता मिकी काय करतोय, हे तुम्हाला माहित आहे का?
मिकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक रील शेअर केली आहे. यामध्ये लहानपणापासून आतापर्यंतचा त्याचा प्रवास पहायला मिळतोय. अभिनयक्षेत्रात काम करणारा मिकी आता डॉक्टर बनला आहे. या व्हिडीओमध्ये 'क्रिश' चित्रपटातील फुटेज आणि हृतिक रोशन, राकेश रोशन यांच्यासोबतचे फोटोसुद्धा पहायला मिळत आहेत.
'तुम्ही कदाचित मला याआधी पाहिला असाल. ओह अर्थातच तुम्ही पाहिलं असेल. मला ज्युनिअर क्रिश साकारण्याची अभूतपूर्व संधी मिळाली होती. अत्यंत प्रतिभावान कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. बालकलाकार ते डोळ्यांचा सर्जन बनवण्यापर्यंतचा माझा प्रवास विस्मयकारक आहे', असं त्याने लिहिलंय.
'आयुष्यातील हे परिवर्तन अद्भुत अनुभवांनी आणि अपवादात्मक शिकवणींनी भरलेलं आहे. अभिनय क्षेत्रात काम करताना मिळालेले धडे हे माझ्या आताच्या क्षेत्रात प्रोत्साहन देतात. या अनोख्या वाटेवरील प्रत्येक पावलाबद्दल मी कृतज्ञ आहे. आता मी तुमच्या आय केअरचा सुपरहिरो बनू शकतो', अशा शब्दांत त्याने प्रवास मांडला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List