ब्रेस्ट कॅन्सरनंतर हिना खानने घेतला अत्यंत मोठा निर्णय, अभिनेत्रीला पाहून आई लागली ढसाढसा रडायला आणि…

ब्रेस्ट कॅन्सरनंतर हिना खानने घेतला अत्यंत मोठा निर्णय, अभिनेत्रीला पाहून आई लागली ढसाढसा रडायला आणि…

हिना खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे हिना खानने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. हिना खान मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. हिना खान हिला आजही लोक अक्षरा या नावानेच ओळखतात. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरातही धमाकेदार कामगिरी करताना हिना खान ही दिसली होती. हिना खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. विशेष म्हणजे आयुष्यातील एका वाईट काळातही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात सोशल मीडियाच्या माध्यमातून हिना खान दिसत आहे.

हिना खान हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. हिना खान ब्रेस्ट कॅन्सरसोबत लढाई लढत आहे. ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्यात हिना खान आहे. ब्रेस्ट कॅन्सर झाल्यापासून सोशल मीडियावर सतत पोस्ट शेअर करताना हिना खान दिसत आहे. आता नुकताच हिना खान हिने एक पोस्ट आणि काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. 

हिना खान हिची ही पोस्ट पाहून चाहते चिंतेत आल्याचे बघायला मिळतंय. हिना खानने तिचे केस कट केले आहेत. हिना खानची कीमोथेरपी सुरू झालीये. यामुळे हिना आपले केस कट करताना दिसतंय. हिना खान आपली लढाई खंबीरपणे लढताना दिसत आहे. मात्र, मुलीची स्थिती पाहून तिची आई रडताना दिसत आहे. हिना खानने तिच्या पोस्टसोबत एक व्हिडीओही शेअर केलाय.

यामध्ये केस कट करण्याची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे व्हिडीओमध्ये तिच्या आईचा रडण्याचा आवाज येताना दिसतोय. हिना खानने लिहिले की, व्हिडीओमध्ये तुम्हाला माझ्या कश्मीरी आईचा जड आवाज येत असेल, ती मला आर्शिवाद देत आहे. कारण ती स्वत:ला काहीतरी बघण्यासाठी तयार करत होती, कधी तिने याची साधी कल्पना देखील केली नव्हती.

मला माहिती आहे केस कट करणे किती जास्त अवघड आहे. केस एक मुकुट आहे, जे कधीच काढला जात नाही. जर तुम्ही इतकी मोठी लढाई लढत असाल तर तुम्हाला हे केस सोडावे लागतील. जर तुम्हाला ही लढाई यशस्वीपणे लढायची असेल तर काही वेगळे निर्णय घ्यावे लागतात. मी या लढाईमध्ये जिंकण्याचे ठरवले आहे. जिंकण्यासाठी मी प्रत्येक संधी देत आहे.

मी माझे सुंदर केस गळून जाण्यापेक्षा त्यांना सोडण्याचा निर्णय घेतलाय. मी काही आठवडे या मानसिक त्रासामधून जाऊ इच्छित नाहीये. त्यामुळे मी स्वत: मुकुट सोडण्याचा निर्णय घेतला. माझी ताकद आणि माझे प्रेम माझ्या स्वत:वर आहे आणि हा या केसांचे एक चांगले विग बनवलण्याचा निर्णय देखील मी नक्कीच घेतला आहे, असेही हिना खान हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;