2000 लोकांना निमंत्रण पाठवलं, पण लग्नापूर्वी जुही चावलाच्या सासूबाईंनी जे केलं…

2000 लोकांना निमंत्रण पाठवलं, पण लग्नापूर्वी जुही चावलाच्या सासूबाईंनी जे केलं…

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री जुही चावलाने तिच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. तिने अनेक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट चित्रपट दिले आहेत. जुहीने आमिर खानसोबत ‘कयामत से कयामत’ या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिचा हा पहिलाच चित्रपट खूप हिट ठरला. आणि ती रातोरात हिट झाली. चित्रपटांमध्ये चांगली ओळख मिळाल्यानंतर अभिनेत्रीने 1990 च्या दशकात सेटल होण्याचा निर्णय घेतला. 5 वर्षांनंतर तिने बिझनेसमन जय मेहताशी लग्न केले.
मात्र तिचं लग्न झाल्याचं बराच काळ लोकांना माहीत नव्हतं.

तिच्या ग्रँड वेडिंगची बातमी उघड झाल्यावर तिची प्रतिक्रिया कशी होती यावर जुहीने प्रकाश टाकला आहे. गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीशी नुकत्याच झालेल्या संवादादरम्यान, जुहीने लग्नाच्या काही आठवणी सांगितल्या. लग्नं अवघ्या काही दिवसांवर आलेले असतानाच तिच्या सासूबाईंच्या वागण्याने तिचे मन कसे जिंकले होते त्या आठवणीला उजाळा दिला. तिच्या लग्नानिमित्त सगळ्यांना निमंत्रण दिले होते, पण तिच्या सासूने ते अचानक रद्द केल्याचा किस्सा जुहीने सांगितलेा.

लग्नाची 2000 निमंत्रणं केली रद्द

जुहीच्या सांगण्यांनुसार, तिच्या लग्नासाठी अनेकांना निमंत्रण देण्यात आले होते. तिच्या सासूबाईंनी सुमारे 2000 पाहुण्यांना पाठवलेली निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घरच्यांना ग्रँड लग्न न करण्याबद्दल पटवून दिले आणि मी व जयने कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत घरी लग्न केले. अवघ्या 80-90 लोकांच्या उपस्थितीत आमचं लग्न केले. खरंतर जुहीला साधेपणे लग्न करायचे होते. आणि तिच्या साऊबाईंनी तिच्या इच्छेचा मान राखत, सर्व पाहुण्यांना पाठवलेली निमंत्रण रद्द केली.

करिअरबद्दल टेन्शनमध्ये होती जुही

त्यावेळी आपल्या डोक्यात, मनात काय भावना होत्या याबद्दलही जुहीने सांगितलं. मी तेव्हा लग्न करणार होते आणि माझ्याकडे अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स होत्या. तेव्हा करिअरमुळे आणि आई गेल्यामुळे मी टेन्शनमध्ये होते, त्याची चिंता मला सतावत होती.

जुही चावला आणि पती जय मेहता या दोघांना जान्हवी ही मुलगी आणि अर्जुन मेहता , मुलगा, अशी दोन मुलं आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून जुही मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;