घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला, मग अचानक गायब झाली; पंधरा वर्षांनी शोध लागला अन् सर्वच हैराण झाले!

घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला, मग अचानक गायब झाली; पंधरा वर्षांनी शोध लागला अन् सर्वच हैराण झाले!

घरच्यांच्या विरोधात जाऊन पंधरा वर्षांपूर्वी महिलेने प्रेमविवाह केला. मग एक दिवस अचानक गायब झाली. यावेळी दागिने घेऊन पळून गेल्याचा दावा सासरच्यांनी केला. मात्र पंधरा वर्षांनी महिलेचा अखेर शोध लागला आणि नातेवाईकांसह पोलीसही हैराण झाले. महिलेच्या सासरच्या घरातील सेप्टीक टँकमध्ये तिचा सांगाडा सापडल्याने सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तर पती परदेशात असून, त्याला केरळमध्ये परत आणण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, कला नामक महिलेचे 2008 मध्ये अनिल कुमार याच्यासोबत लग्न झाले होते. दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने त्यांच्या घरच्यांचा दोघांच्या प्रेमविवाहाला विरोध होता. दोघांना एक मुलगाही आहे. मात्र 15 वर्षांपूर्वी अचानक कला घरातून गायब झाली. यानंतर घरच्यांनी कला दागिने घेऊन दुसऱ्यासोबत पळून गेल्याचा कांगावा केला होता.

पतीने कला गायब झाल्याची तक्रारही केली नाही. तब्बल 15 वर्षांनंतर अंबालपुझा पोलिसांना कला गायब असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. तपासाअंती अखेर सत्य समोर आले आणि सर्वच हैराण झाले. कला पळून गेली नसून, तिची हत्या करून मृतदेह घरातील सेप्टीक टँकमध्ये टाकल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी मृतदेहाचा सांगाडा ताब्यात घेत फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले. घटनास्थळावर पोलिसांना हत्या झाल्याचे दर्शवणारे काही पुरावेही सापडले आहेत. कलाचा पती अनिल कुमार या प्रकरणात मुख्य संशयित आहे. सध्या तो दुसऱ्या पत्नीसह इस्राईलमध्ये नोकरी करतो. त्याला इस्राईलमधून केरळमध्ये आणण्यासाठी पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत. तर अन्य पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;