विशाळगड अतिक्रमणमुक्ती संदर्भातील आंदोलन तापणार, युवराज संभाजीराजेंनी बोलावली बैठक

विशाळगड अतिक्रमणमुक्ती संदर्भातील आंदोलन तापणार, युवराज संभाजीराजेंनी बोलावली बैठक

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावरील वाढत्या अतिक्रमणांविरोधात आता पुन्हा एकदा शिवप्रेमी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशाळगड अतिक्रमणमुक्ती संदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी युवराज व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.

येत्या रविवार, दि. 7 जुलै रोजी येथील शासकीय विश्रामगृहात होणाऱ्या या बैठकीस राज्यभरातून दुर्गप्रेमी संस्था व शिवभक्त उपस्थित राहणार असल्याचे संभाजीराजे यांच्याकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

गडकोटांच्या संवर्धनासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या संभाजीराजे यांनी या विषयात पुढाकार घेऊन, विशाळगडास अतिक्रमण व धर्मांधतेच्या विळख्यातून मुक्त करावे, अशी राज्यभरातील अनेक शिवभक्तांनी पत्रव्यवहार, सोशल मीडिया व प्रत्यक्ष भेटून मागणी केलेली आहे. स्वतः संभाजीराजे यांनीसुद्धा दीड वर्षांपूर्वी विशाळगडावर प्रत्यक्ष भेट देऊन, पाहणी करून गडावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतली होती.

या बैठकीत गडावर पशुपक्षी हत्याबंदी लागू करण्याचे निश्चित झाले होते. तसेच तीन महिन्यांत गडावरील अतिक्रमणे हटविली जातील, असे आश्वासन तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले होते. मात्र, स्थानिक राजकारण्यांनी आणलेला अडथळा व जिल्हा प्रशासनाची अकार्यक्षमता यामुळे ही कामे अर्ध्यातच बंद पडली. त्यामुळे गडावर पुन्हा एकदा अतिक्रमणे व धर्मांधता जोर धरू लागली आहे, असे छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;