कांदा, दूधदराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे उद्या नगरमध्ये जन आक्रोश आंदोलन

कांदा, दूधदराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे उद्या नगरमध्ये जन आक्रोश आंदोलन

निर्यातबंदीमुळे कांद्याचे कोसळलेले भाव तसेच दुधाच्या दरात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. 5) शेतकरी जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता या आंदोलनास सुरुवात होणार असून, या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

या आंदोलनासंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन दिले आहे. राज्यातील कांदा व दूध उत्पादक शेतकरी योग्य भाव न मिळाल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. दुधाचे भाव वर्षभर सातत्याने कोसळत आहेत. सध्या दुधाला मिळणाऱ्या भावामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सरकारने दुधाला अनुदान देण्याची घोषणा केली खरी; परंतु जाचक अटी व शर्तींमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. नुकतीच केंद्र सरकारने दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही आयात करमुक्त असल्यामुळे दूध उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेती तोट्यात जात आहे. वाढलेली महागाई, नैसर्गिक आपत्ती, खतांचे वाढलेले दर, सरकारचे शेतीमालासंदर्भातील चुकीचे धोरण, रासायनिक खते, बी-बियाणे, कीटकनाशके, शेती-अवजारे यांच्या माध्यमातून जीएसटीचा शेतकऱ्यांवर बोजा पडलेला आहे. यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने संपूर्ण कर्जमाफीसह तत्काळ विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे.

राज्यातील शेतकऱ्यांमध्ये दूध आणि शेतीमालाच्या हमीभावावरून प्रचंड असंतोष आहे. यासाठी अनेक शेतकरी संघटना विविध आंदोलने करीत आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला 40 रुपये दर मिळावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, कांदा व इतर शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा, या मागणीसाठी हजारो शेतकरी, दूध उत्पादक तसेच विविध शेतकरी संघटनांसह 5 जुलै रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे खासदार लंके यांनी निवेदनात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;