गुप्तधनाच्या आमिषापोटी घरात चार फूट खड्डा खणून अघोरी पूजा, सहा जणांना अटक

गुप्तधनाच्या आमिषापोटी घरात चार फूट खड्डा खणून अघोरी पूजा, सहा जणांना अटक

गुप्तधनाच्या आमिषापोटी घरात चार फूट खड्डा खणून अघोरी पूजा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार राधानगरी तालुक्यातील कौलव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री सहा जणांना अटक केली आहे. कौलव गावचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला.

शरद धर्मा माने (रा. कौलव), महेश सदाशिव माने (रा. राजमाची, ता. कराड, जि. सातारा), आशीष रमेश चव्हाण, चंद्रकांत महादेव धुमाळ (दोघे रा. मंगळवार पेठ, कराड, जि. सातारा), संतोष निवृत्ती लोहार (रा. वाझोली ता. पाटण, जि. सातारा), कृष्णात बापू पाटील (रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

राधानगरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कौलव येथील शरद धर्मा कांबळे या युवकाने घरात असलेल्या गुप्तधनप्राप्तीसाठी काही अघोरी प्रकार सुरू केला होता. त्याच्या राहत्या घरी देवाऱ्यासमोर चार फुटांचा खड्डा खणून विधिवत पूजा केली जात असल्याचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ राधानगरी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून या घरात धार्मिक विधी केले जात होते. याबाबत सरपंच कुंभार आणि माजी उपसरपंच व फिर्यादी अजित पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी थेट घरात प्रवेश केला. त्यावेळी एका चटईवर केळीच्या पानावर हळद-कुंकू, सुपारी, नारळ, पानाचे विडे, टाचण्या मारलेली लिंबू अशी पूजा घातल्याचे दिसून आले. त्यातील संशयित आरोपी चंद्रकांत धुमाळ हा मंत्रोच्चार करत होता. त्याच्या गळ्यात रुद्राक्ष व वेगवेगळ्या मण्यांच्या माळा घातलेल्या होत्या. त्याच्या शेजारी संशयित आरोपी शरद माने बसलेला होता.

आतील खोलीत देवघरासमोर चार फुटांचा खड्डा खणला होता. फिर्यादी पाटील यांनी आरोपींना याबाबत विचारले असता, संशयित आरोपी संतोष लोहार याने या खड्ड्यांमध्ये गुप्तधन मिळणार आहे. त्यासाठीच ही पूजा करत आहोत, असे सांगितले. संशयित आरोपी आशीष चव्हाण याने येथून निघून जा; अन्यथा तुम्हाला ठार मारीन, अशी धमकी दिली. ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच अजित पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;