माणूस माणुसकी विसरला पण प्राणी नाही! वसईत भटक्या कुत्र्याने ‘अशी’ वाचवली महिलेची अब्रू

माणूस माणुसकी विसरला पण प्राणी नाही! वसईत भटक्या कुत्र्याने ‘अशी’ वाचवली महिलेची अब्रू

हल्ली कुठेही कुणावर अन्याय होत असेल तर माणसं मदतीला जाण्याऐवजी मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवण्यात व्यस्त असतात. एखाद्या महिलेवरही अत्याचार होत असेल तरीही कुणी माणुसकी दाखवत नाही. पण माणसाला लाजवेल असे कृत्य एका भटक्या कुत्र्याने करून दाखवले आहे. एका भटक्या कुत्र्यामुळे 32 वर्षीय महिलेची नराधमाच्या तावडीतून सुटका झाली आहे. वसईतील तुंगारेश्वर परिसरात ही घटना घडली आहे.

पेशाने अकाऊंटंट असलेली ही महिला पहाटेच्या सुमारास तुंगारेश्वर परिसरातून चालली होती. यावेळी एका 35 वर्षाच्या तरुणाने तिचा पाठलाग सुरू केला. अखेर तुरंगारेश्वर गल्लीत अंधारात त्याने तिला गाठलेच. यानंतर त्याने महिलेला बलात्कार करण्याची धमकी देत खाली जमिनीवर ढकलले आणि तिला घाणेरडे स्पर्श करू लागला.

इतक्यात एक भटका कुत्रा तेथे आला आणि आरोपीच्या अंगावर जोरजोरात भुंकू लागला. कुत्र्याच्या भुंकण्यामुळे आरोपीची पकड सैल झाली. याचा फायदा घेत महिलेने आरोपीला जोरदार धक्का बाजूला ढकलले आणि मेन रोडच्या दिशेने पळाली. भटक्या कुत्र्यामुळे महिलेची अब्रू वाचली. मात्र आरोपी महिलेचा आयफोन हिसकावण्यात यशस्वी झाला.

महिलेने तात्काळ माणिकपूर पोलीस ठाणे गाठत घडला प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवत आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीचा कसून शोध घेत 24 तासात पोलिसांनी नालासोपारा येथून त्याच्या मुसक्या आवळल्या. संदीप खोत असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ‘मिड डे’ने याबाबत वृत्त दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;