कंगनाला थोबडवणारी सीआयएसएफ जवान पुन्हा सेवेत
बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतला चंदिगढ विमानतळावर थप्पड मारणारी सीआयएसएफची महिला जवान कुलविंदर कौरला पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. कौरला ट्रान्सफर लेटर जारी करण्यात आले असून ताबडतोब बंगळुरू विमानतळावर रुजू होण्यास सांगितले आहे. कंगनाला जोरदार कानाखाली मारल्यानंतर सीआयएसएफने कारवाई करत कौरला निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी कौरविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी कलम 323 (प्राणघातक हल्ला) आणि 341 (रस्ता अडवणे) याअंतर्गत कारवाई केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List