गुजरातमध्ये भाजपचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला, तुफान दगडफेक, वाहनांची तोडफोड

गुजरातमध्ये भाजपचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला, तुफान दगडफेक, वाहनांची तोडफोड

काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत कमळाबाईच्या नकली हिंदुत्वाची सालटी काढल्यानंतर आता भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. गुजरातमध्ये काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. दगडफेक करीत वाहनांची तोडपह्ड केली. दरम्यान, भाजपच्या या गुंडगिरीवर राहुल गांधींनी थेट भाष्य केले आहे. भ्याड आणि हिंसक हल्ला करून भाजप आणि संघ परिवाराने माझे वक्तव्य खरे ठरवले, असे ते म्हणाले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चे वेळी लोकसभेत बोलताना सोमवारी राहुल गांधी यांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नकली हिंदुत्वाची जोरदार चिरफाड केली. ‘‘भाजप, संघ आणि मोदी म्हणजे हिंदुत्व नाही. भाजप, संघ म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही. हिंदुत्व हा काही भाजपचा ठेका नाही,’’ असे राहुल गांधींनी फटकारले होते. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर भाजपने देशभरात काँग्रेस कार्यालयांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदी, गृह मंत्री शहांच्या गुजरातमध्ये भाजपने हिंसक आंदोलन केले. भाजप कार्यकर्त्यांनी मंगळवारी अहमदाबादेत काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला. तुफान दगडफेक करीत वाहनांची तोडपह्ड केली. काँग्रेस कार्यकत्यांनी याला विरोध केला. दगडफेकीत पोलीसही जखमी झाले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. दरम्यान, गांधीनगर, राजकोटसह गुजरातच्या इतर शहरांमध्येही काँग्रेस कार्यालयांसमोर भाजपने आंदोलन केले.

भाजपनं माझं मत खरं ठरवलं!

काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी ‘एक्स’द्वारे भाजपला फटकारले. गुजरात काँग्रेसच्या कार्यालयावर झालेल्या भ्याड आणि हिंसक हल्ल्याने भाजप व संघ परिवाराने माझं मत खरं ठरवलं आहे. हिंसाचार आणि द्वेष पसरवणाऱया भाजपच्या लोकांना हिंदू धर्माची मूलभूत तत्त्वेच कळत नाहीत. गुजरातची जनता त्यांचा खोटेपणा स्पष्टपणे पाहू शकते आणि भाजप सरकारला जनता निर्णायक धडा शिकवेल. मी पुन्हा सांगतोय, गुजरातमध्ये इंडिया आघाडी जिंकणार आहे, असे राहुल म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;