टीम इंडियाची उद्या मरिन ड्राईव्हला विजयी मिरवणूक, ट्राफिक पोलिसांनी मुंबईकरांना केले हे आवाहन
विश्वचषक जिंकून हिंदुस्थानात परतणाऱ्या टीम इंडियाची उद्या 4 जुलै 2024 ला मरिन ड्राईव्ह येथे विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीसाठी एनसीपीए ते वानखेडे स्टेडियमपर्यंतच्या रस्त्यांच्या वाहतूकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. दुपारी 3 ते 9 दरम्यान हे बदल करण्यात आले असून मुंबई ट्राफिक पोलीस विभागाकडून ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
दि. ४-७-२०२४ रोजी एनसीपीए ते वानखेडे स्टेडियमपर्यंत टी २० विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी मिरवणुकीच्या अनुषंगाने, १५.०० ते २१.०० वा. वेळेत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. #RouteForChampions pic.twitter.com/n5x8wHYkOu
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) July 3, 2024

वानखेडे स्टेडियमच्या दिशेने दक्षिणेकडे जाणाऱ्या मार्गावर सुद्धा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाहन चालकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आपल्या प्रवासाच्या मार्गाचे नियोजन करावे.#विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन! #RouteForChampions
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) July 3, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List