दीपिका पदुकोण बॉलिवूडला करणार बाय-बाय? काय आहे कारण

दीपिका पदुकोण बॉलिवूडला करणार बाय-बाय? काय आहे कारण

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. दीपिका पदुकोण सध्या गरोदर आहे. पण तरी देखील ती सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कुठेही मागे नव्हती. दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी च्या प्रमोशनमध्ये बेबी बंप घेऊन प्रचार करत आहे. तर प्रभास आणि अमिताभ बच्चन तिची खूप काळजी घेताना दिसत आहेत. दीपिकाच्या फॅन पेजवर अनेक लोकं म्हणत आहेत की, हा तिचा शेवटचा चित्रपट असावा. पण लोकांना असं का वाटतंय? यामागचे कारण म्हणजे दीपिका पदुकोणने एकेकाळी केलेले विधान आहे.

दीपिका पदुकोण सप्टेंबरमध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. त्याआधी दीपिका पदुकोणने ‘माय चॉइस’च्या एका व्हिडिओमध्ये सांगितले होते की, सुखी वैवाहिक जीवनासाठी ती अभिनय देखील सोडू शकते. तिने हे विधान तेव्हा केले होते जेव्हा दीपिका पदुकोण बॉलिवूड स्टार रणवीर सिंगला डेट करत होती. पुढे आता दोघांनी लग्न केले आहे आणि लवकरच ते एका बाळाचे पालक होणार आहेत. इतकेच नाही तर दीपिका पदुकोणने डीएनए मुलाखतीत सांगितले होते की, तिला मुलं खूप आवडतात आणि तिला खूप मुलं हवी आहेत. दीपिकाने सांगितले होते की, ती शाहरुख खानचा मुलगा अबराम आणि होमी अदजानियाच्या मुलांसोबत खूप वेळ घालवते.

प्रसूतीनंतर दीपिका अभिनय सोडणार का?

दीपिका पदुकोणसाठी ही वेळ खूप खास आहे. कारण ती पहिल्या अपत्याला जन्म देणार आहे. पण असं असलं तरी जन्मानंतर चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीला चित्रपटात पाहायला मिळणार नाही? या प्रश्नाचे उत्तर स्वतः दीपिकाच देऊ शकते. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मानेही तिच्या पहिल्या अपत्याच्या जन्मानंतर चित्रपटांमधील भूमिका खूपच कमी केल्या होत्या, तरीही तिने कॅमेऱ्याच्या मागे काम करणे सुरूच ठेवले होते.

दीपिका ‘लेडी सिंघम’च्या भूमिकेत दिसणार

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका पदुकोण ‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दीपिका पदुकोण देखील रोहित शेट्टीच्या या सिनेमाचा भाग आहे. नुकतेच रोहित शेट्टीने दीपिका पदुकोणला लेडी सिंघमच्या भूमिकेत आणणार असल्याचे जाहीर केले होते. याआधी रणवीर सिंग, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​रोहित शेट्टीच्या पोलीस विश्वाचा एक भाग बनले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;