आयुक्त जावळे यांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल
महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी बुधवारी वकिलामार्फत न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने सरकारी पक्षाला नोटीस बजावून गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी ठेवण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश एन आर नाईकवाडे यांनी दिले आहे.
नगर महानगरपालिकेमध्ये मागील आठवड्यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे व लिपिक देशपांडे यांना लाच घेण्याचे संभाषण हाती लागल्यानंतर त्यांच्यावर येथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे .या घटनेपासून दोघेही जण फरार आहेत.
बुधवारी ज्येष्ठविधीज्ञ अभिजीत पुप्पाल यांच्यामार्फत फिर्यादी किरण काळे यांनी न्यायालयामध्ये वकीलपत्र दिले आहे व ते न्यायालयासमोर हजर झाले आहेत तर दुसरीकडे आयुक्त जावळे यांनी वकील सतीश गुगळे यांच्यामार्फत त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. न्यायालयाने या प्रकरणासंदर्भामध्ये सरकारी पक्षाला नोटीस बजावली असून गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List