जुन्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी पोहोचली अरमान मलिकची पहिली पत्नी, लोक म्हणाले, तुम्ही…

जुन्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी पोहोचली अरमान मलिकची पहिली पत्नी, लोक म्हणाले, तुम्ही…

अरमान मलिक हा बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सर्वाधिक चर्चेत असणारे एक नाव आहे. अरमान मलिक हा बिग बॉसच्या घरात आपल्या दोन्ही पत्नींसोबत पोहोचला होता. मात्र, अरमान मलिकची पहिली पत्नी पायल ही बिग बॉसमधून बाहेर आलीये. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अनेक मोठे खुलासे करताना पायल ही दिसलीये. विशेष म्हणजे अरमान मलिक हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. अरमान मलिक याने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, त्याच्याकडे 200 कोटींची एकून संपत्ती आहे.

व्लॉगच्या माध्यमातून मलिक कुटुंबिय चाहत्यांच्या संपर्कात असतात. सध्या पायल मलिक हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये पायल मलिक मोठा खुलासा करताना दिसतंय. या व्हिडीओमध्ये पायल मलिक म्हणते की, मी आज माझ्या लहानपणीच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी जात आहे.

विशेष म्हणजे याबद्दल अरमानला देखील माहिती आहे. प्रत्येकाचे लहानपणीचे प्रेम असते कोणीही धुतलेल्या तांदळाचे नसते. मला माझ्या लहानपणीच्या बॉयफ्रेंडने मेसेज केला आणि त्याला भेटण्यासाठी मी जात आहे. तो मला भेटण्यासाठी कॅफेत आल्याचे सांगताना देखील व्हिडीओमध्ये पायल ही दिसत आहे.

मी माझ्या लहापणीच्या बॉयफ्रेंडला गोलूला देखील भेटवणार आहे. मी अगोदरच याच्याबद्दल अरमानजीला सांगितले होते. लहानपणीचे प्रेम असते ते आपण कधीच विसरू शकत नसल्याचे सांगताना देखील पायल ही दिसत आहे. आता हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी पायलला खडेबोल देखील सुनावले आहेत. पायलचा व्हिडीओ बिग बॉसमध्ये सहभागी होण्याच्या अगोदरचा आहे.

एकाने या व्हिडीओवर कमेंट करत थेट म्हटले की, तुमचे सर्व कुटुंबच असे आहे का? दुसऱ्याने लिहिले की, पायल हे काय बोलत आहे. आता पायल मलिक ही तिच्या घरी पोहोचलीये. पायलचे विमानतळावर जोरदार स्वागत तिच्या कुटुंबाकडून करण्यात आले. हेच नाहीतर तिचे चारही लेकरं तिला घेण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;