मराठी अभिनेत्रीच्या घरी चोरी, धक्क्याने आईला अर्धांगवायू, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचा सध्या एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. तिच्या पेणमधील विकेंड होममध्ये चोरी झाली असून घरातल्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. जान्हवीने व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
जान्हवी किल्लेदार सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती म्हणतेय की, ”पेणंमध्ये माझं एक लहान घर आहे. ते माझं विकेंड होम असून आम्ही तिथे शनिवार रविवार जातो. माझ्या त्या घरी चोरी झाली. त्यात घरातील स्पिकर, साड्या, भावाची गिटार, भावाचे घड्याळ्यांचे कलेक्शन अशा मौल्यवान वस्तू चोरण्यात आले. एसी काढण्याचाही चोरांनी प्रयत्न तेला मात्र त्यांना तो नेता आला नाही. फ्रिज हलविण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांना याबाबत माहिती दिली असून त्याबाबत पोलीस तपास करत आहेत”.
जर तुमचही असंच विकेंड होम असेल आणि ते बंद असेल तर कृपय़ा काळजी घ्या. सतर्क राहा. चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. जान्हवी पुढे म्हणाली व्हिडीओ यासाठी बनवला की, आपण सर्वांनी सतर्क व जागरूक राहण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्हीही ज्या घरी जास्त राहत नाही किंवा विकेंडलाच जाता, त्यासाठी काळजी घ्या आणि सतर्क राहा असे आवाहन केले आहे.
पेणचे पोलीस या सगळ्या प्रकरणाचा शोध घेत आहेत. चोर सापडतील की नाही याची शाश्वती नाही. याचे कारण म्हणजे आम्ही फक्त वीकेंडला तिथे जातो त्यामुळे नेमकी चोरी कोणत्या दिवशी झाली याची आम्हाला कल्पना नाही. माझ्या आईने या सगळ्या गोष्टींचं दडपण घेतल्यामुळे तिला अर्धांगवायूचा अटॅक आला. अजूनही ती रुग्णालयात आहे. त्यामुळे तुमचंही असं बाहेर कुठे घर असेल तर काळजी घ्या.” असेही तिने आवाहन केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List