बहिणीच्याच सासऱ्यांविरोधात ट्विट करणाऱ्या लव सिन्हाची कोट्यवधींची संपत्ती
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने 23 जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी स्पेशल मॅरेज अॅक्टअंतर्गत लग्न केलं. मात्र या लग्नाबद्दल सोनाक्षीच्या कुटुंबात नाराजी असल्याची चर्चा आहे. सोनाक्षीचा सख्खा भाऊ लव सिन्हाने केलेल्या काही ट्विट्सनंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
लव सिन्हाने सोनाक्षीच्या सासऱ्यांविरोधात एक पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्याने ती डिलिट केली. माझ्यासाठी हे प्रकरण संपलंय असंही त्याने म्हटलंय. तेव्हापासून लव सिन्हाबद्दल चर्चेला सुरुवात झाली आहे.
लव सिन्हा हा सोनाक्षीचा मोठा भाऊ आहे. त्याने वेबस्टर युनिव्हर्सिटीमधून 2004 मध्ये स्कूल ऑफ मास कम्युनिकेशनमधून पदवी संपादित केली आहे. लवने बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावलं होतं. 2010 मध्ये 'सदियाँ' या चित्रपटातून त्याने पदार्पण केलं होतं. याशिवाय तो जे. पी. दत्ता यांच्या 'पलटन'मध्येही झळकला होता.
2020 मध्ये लवने राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवलं. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्याने निवडणूकसुद्धा लढवली होती. बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून त्याने काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती. मात्र भाजपच्या नितीन नबिन यांनी त्याचा पराभव केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List