तिने मुलांच्या मनात विष..; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीबद्दल काय म्हणाल्या शबाना?

तिने मुलांच्या मनात विष..; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीबद्दल काय म्हणाल्या शबाना?

प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांचं खासगी आयुष्य अनेकदा चर्चेत आलं. जावेद यांनी 1972 मध्ये हनी इराणी यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 13 वर्षांनंतर ते विभक्त झाले आणि 1984 मध्ये त्यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी दुसरं लग्न केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका शबाना आझमी या हनी इराणी यांच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. जावेद अख्तर हे विवाहित आणि दोन मुलांचे पिता असताना त्यांना जीव शबाना यांच्यावर जडला होता. पतीच्या या विश्वासघाताबद्दल हनी यांच्या मनात सुरुवातीला फार कटुता होती. मात्र हळूहळू त्यांनी समजुदारपणे सर्वकाही हाताळलं, असं शबाना म्हणाल्या. यासाठी त्यांनी हनी यांना पूर्णपणे श्रेय दिलं.

काय म्हणाल्या शबाना आझमी?

अरबाज खानच्या ‘द इन्विन्सिबल्स सीरिज’ या चॅट शोमध्ये शबाना आझमी पाहुण्या म्हणून उपस्थित झाल्या होत्या. “मी खूप खुश आहे कारण माझं झोया आणि फरहानसोबतचं नातं खूप चांगलं आहे. याचं संपूर्ण श्रेय मी हनीला देते. त्यावेळी ते दोघं खूप लहान होते आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन जाणं ही हनीसाठी सर्वांत सोपी गोष्ट होती. मात्र तिने तसं केलं नाही. तिने मुलांच्या मनात आमच्याविरोधात विष कालवलं नाही. उलट त्यांना आमच्यासोबत राहण्यासाठी प्रोत्साहित केलं. मी खरंच हनीला यासाठी खूप मानते. कारण तिने ते औदार्य दाखवलं. आज हनीसोबतही आमचं नातं खूप चांगलं आहे. आजही मध्यरात्री उठून तिला कोणतीही गरज लागली, तरी ती आत्मविश्वासाने जावेद यांना फोन करू शकते. तेसुद्धा तिच्या मदतीला धावून जाऊ शकतात. इतकं चांगलं आमचं नातं आहे”, असं त्या म्हणाल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18)

याविषयी त्यांनी पुढे पुढे सांगितलं, “आमच्यात कोणत्याही प्रकारची कटुता राहू नये असा निर्णय आम्ही घेतला होता. अर्थात सुरुवातीला तिच्या मनात कटुता होतीच. तिच्या मनात नाकारले गेल्याची भावना होती. पण जावेद यांनी सांभाळून घेतलं. आज या सर्वांतून आमच्या कुटुंबात जे नातं आहे, त्यावर मला अभिमान आहे.”

जावेद अख्तर म्हणाले की त्यांना दारूचं खूप वाईट व्यसन होतं आणि याच कारणामुळे हनी इरानीसोबतचं त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. “मला खात्री आहे की जर मला दारूचं व्यसन नसतं आणि जर मी आणखी जबाबदार असतो, तर कहाणी थोडी वेगळी असती”, अशी खंत अख्तर यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;