मनी लाँड्रिंग प्रकरणी अभिनेत्री निया शर्माला ED ची नोटीस, आणखी दोन कलाकारांचीही होणार चौकशी
मनी लाँड्रिंग प्रकरणात कथित सहभाग असल्याच्या आरोपावरून आणखी तीन टीव्ही कलाकारांना ईडीने नोटीस बजावली आहे. यामध्ये निया शर्मा, क्रिस्टल डिसुझा आणि करण वाही यांचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, क्रिस्टल डिसुझा आणि करण वाही यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तर निया शर्माला नोटीस बजावण्यात आली आहे.
याप्रकरणी ईडीने एप्रिलमध्ये मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली येथील अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. या शोध मोहिमेदरम्यान अनेकांचे जबाब ईडीने नोंदवले होते.
निया आणि क्रिस्टल यांनी ‘एक हजारों में मेरी बहना है’ या टीव्ही मालिकेत एकत्र काम केले होते. यानंतर क्रिस्टलने ‘ब्रम्हराक्षस’, ‘बेलन वाली बहू’ आणि ‘एक नई पहचान’ यासारख्या शो मध्ये काम केले आहे. तर निया शर्मा सध्या ‘सुहागन चुडैल’ आणि ‘लाफ्टर शेफ्स’ या शो मध्ये काम करत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List