घरात बायको असताना, पुरुषांच्या बाहेर अनेक गर्लफ्रेंड्स आणि…, पायल मलिकचं मोठं वक्तव्य

घरात बायको असताना, पुरुषांच्या बाहेर अनेक गर्लफ्रेंड्स आणि…, पायल मलिकचं मोठं वक्तव्य

‘बिग बॉस ओटीटी 3’ शो सुरु झाल्यापासून युट्यूबर अरमान मलिक याच्या लग्नाची चर्चा तुफान रंगली आहे. अरमान त्याच्या दोन पत्नींसोबत बिग बॉसमध्ये आला. पण त्याच्या पहिल्या पत्नीचा प्रवास पहिल्याच आठवड्यात संपला. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर पायल मुलाखतींच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहे. अनेकांनी तिघांवर बहुपत्नीत्वाचा आरोप केला आहे, त्यावर पायलनेही तिची प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पायल मलिकने सांगितले की, अरमान हा एकटाच नाही ज्याने दोन लग्न केले आहेत. किंवा ज्याला दोन बायका आहेत. अरमानच्या दुस-या लग्नाला मी पाठिंबा देत आहे, असं नाही. पण त्याच्याकडून चूक झाली. त्यानंतर अनेक वाईट प्रसंगांचा सामना आम्ही केला आहे. तो एकटा नाही ज्यान दोन लग्न केली आहेत. पण व्लॉगमुळे आमच्या खासगी आयुष्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. अनेक लोकं आमच्या बद्दल बोलत असतात…’

‘माझा मान्य आहे की, अरमानने दोनदा लग्न करून चूक केली आणि गोष्टी नियंत्रणाबाहेर गेल्या. घरात बायको असताना लोकांच्या बाहेर गर्लफ्रेंड्स असतात. शिवाय, भारतात अशी अनेक लोकं आहेत ज्यांची दोन लग्न झाली आहे… असं देखील पायल मुलाखतीत म्हणाली.

पायल मलिकने अशाच एका मुलाखतीत सांगितलं होतं की, कृतिका आणि अरमानचं लग्न कायदेशीर नाही. कृतिका अरमानची ही कायदेशीर पत्नी नाही. पण आम्हाला काहीही अडचण नाही तर, हा चर्चेचा विषय नाही. आता आम्ही एकत्र राहातो. आमच्या तिघांमध्ये प्रचंड प्रेम आहे. जगातील कोणतीच ताकद आता आम्हाला विभक्त करु शकत नाही.

‘तेव्हा माझ्यासोबत वाईट झालं… माझ्यावर अन्याय झाला. पण आता मी सर्वकाही विसरली आहे. अरमान माझ्यावर कृतिकावर प्रचंड प्रेम करतो. मी याला फसवणूक झाली असं सांगणार नाही. पण जे काही झालं ते चुकीचं होतं…’ असं देखील पायल मुलाखतीत म्हणाली होती.

अरमान मलिक याच्या दोन पत्नी आणि मुलं…

अरमान मलिक याने 2011 मध्ये पायल हिच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर पायल हिने मुलगा चिरायू याला जन्म दिला. त्यानंतर 2018 मध्ये अरमान याने पायल हिला घटस्फोट न देता कृतिका हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. 2022 मध्ये अरमान याने दोन्ही पत्नी गरोदर असल्याची घोषणा केली. अरमान याला चार मुलं आहेत. चिरायू, तूबा, अयान आणि झैद… अशी अरमान याचा मुलांची नावे आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;