अमरनाथ यात्रेहून परतताना बसचा ब्रेक फेल, भाविकांच्या चालत्या गाडीतून उड्या; 10 भाविक जखमी

अमरनाथ यात्रेहून परतताना बसचा ब्रेक फेल, भाविकांच्या चालत्या गाडीतून उड्या; 10 भाविक जखमी

अमरनाथ यात्रेवरून परतत असताना राष्ट्रीय महामार्गावर भाविकांच्या बसचा ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झाल्याने बस अनियंत्रित झाली. यावेळी जीव वाचवण्यासाठी भाविकांनी चालत्या बसमधून उड्या घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत 10 भाविक जखमी झाले असून, सुदैवाने जीवितहानी टळली. जखमींमध्ये सहा पुरुष, तीन महिला आणि एका बालकाचा समावेश आहे.

पंजाबमधील होशियारपूर येथील 40 भाविक मंगळवारी अमरनाथ यात्रेला गेले होते. अमरनाथ यात्रा करून होशियारपूर येथे परतत असताना रामबन जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर बसचा ब्रेक फेल झाला. यामुळे बस अनियंत्रित झाली आणि जीव वाचवण्यासाठी भाविकांनी चालत्या बसमधून उड्या घेतल्या. ही सर्व घटना मोबाईलमध्ये कैद झाली असून, सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भाविकांना चालत्या बसमधून उड्या मारताना पाहून जवान आणि पोलिसांनी तात्काळ धाव घेत टायरखाली दगड टाकून बसला दरीत कोसळण्यापासून वाचवले. लष्कराच्या क्विक रिॲक्शन टीम्स, रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाल्या. सर्व जखमींना वैद्यकीय मदत आणि प्राथमिक उपचार देण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;