वडील हॉस्पिटलमध्ये असताना सोनाक्षीच्या हनिमूनचे रोमँटिक फोटो व्हायरल
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुलगा लव सिन्हाने मंगळवारी दिली. एकीकडे शत्रुघ्न सिन्हा हे आजारी असताना दुसरीकडे सोनाक्षीने सोशल मीडियावर हनिमूनचे फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.
लग्नाच्या नऊ दिवसांनंतर सोनाक्षी आणि झहीर हनिमूनला गेले आहेत. सोनाक्षी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये झहीरसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट करतेय. 'सुंदर सूर्यास्त' असं कॅप्शन देत सोनाक्षीने हा पूलमधील फोटो पोस्ट केला आहे.
झहीरसुद्धा त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सोनाक्षीसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतोय. या दोघांनी 23 जून रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यानंतर 'बॅस्टियन' या हॉटेलमध्ये रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List