‘गरिबी शेतकऱ्याच्या उश्याला, महायुती सरकार अदानीच्या खिशाला’, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची निदर्शने
पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडी राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आक्रमक झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘कोणी निंदा कोणी वंदा भ्रष्टाचार हाच महायुतीचा धंदा’, म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले.
‘गरिबी शेतकऱ्याच्या उश्याला महायुती सरकार अदानीच्या खिशाला’, ‘कोणी निंदा कोणी वंदा भ्रष्टाचार हाच महायुतीचा धंदा’, ‘मुंबई को किसको बेचा अदानी को बेचा’, ‘भ्रष्टाचारात नंबर वन महायुती सरकार आणखी कोण’, ‘स्मार्ट मीटर कुणासाठी अदानीच्या फायद्यासाठी’, ‘गरिबी शेतकऱ्याच्या उश्याला, महायुती सरकार अदानीच्या खिशाला’, अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून महायुती सरकारला घेरल.
जनतेचा पैसा अदानीच्या खिश्यात टाकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, चाळीस टक्के खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, प्रीपेड मीटर ग्राहकांच्या डोक्यावर मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, खोके सरकार हाय हाय, अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List