घरी खेळायला आलेल्या चिमुकलीवर तरुणाकडून अत्याचार

घरी खेळायला आलेल्या चिमुकलीवर तरुणाकडून अत्याचार

घरी खेळायला आलेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर 23 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ओडिसातील भुवनेश्वरमध्ये उघडकीस आली आहे. अत्याचार केल्यानंतर नराधम तेथून पळून गेला, मात्र पोलिसांनी त्याचा कसून तपास करत त्याला अटक केली आहे. संतोष खुंटिया असे आरोपीचे नाव आहे.

पीडित चिमुकली संतोषच्या घरी खेळायला गेली तेव्हा घरी त्याच्या व्यतिरिक्त कुणीही नव्हते. आरोपी संतोष हा दारुच्या नशेत होता. नशेतच त्याने चिमुकलीवर अत्याचार केला आणि तेथून पसार झाला. मुलगी बराच वेळ घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी मुलगी आरोपीच्या घरी गंभीर अवस्थेत सापडली.

कुटुंबीयांनी मुलीला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल नेले. तसेच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत आरोपीचा तपास सुरू केला. शोधमोहिम राबवत 24 तासात पोलिसांनी आरोपीला जवळच्या पिपली परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;