रात्री कुटुंबासोबत जेवण केले अन् बेडरुममध्ये झोपायला गेली; सकाळी पोलीस आले अन् आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली !

रात्री कुटुंबासोबत जेवण केले अन् बेडरुममध्ये झोपायला गेली; सकाळी पोलीस आले अन् आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली !

अंधेरी परिसरात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. एका 18 वर्षाच्या तरुणीची तिच्याच मित्राने हत्या केल्याची घटना अंधेरीतील सहार रोडवर परिसरात घडली आहे. विशेष म्हणजे पोलीस घरी येईपर्यंत पालकांना याची पुसटशीही कल्पना आली नव्हती. सकाळी उशिरापर्यंत मुलगी बेडरुममधून बाहेर आली नाही. काही वेळाने पोलीस घरी आले आणि त्यांनी मुलीची हत्या झाल्याचे आई-वडिलांना सांगितले. यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. झैब ख्वाजा हुसैन सोलकर असे आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

पीडित मुलगी आणि आरोपी सोलकर यांच्यात मैत्री होती. काही कारणाने मुलीने ही मैत्री तोडण्याचा निर्णय घेतला. मात्र आरोपी सोलकर हे मान्य नव्हते. मुलीचा नकार सोलकरला मान्य नसल्याने त्याने टोकाचा निर्णय घेतला.

रविवारी रात्री पीडित मुलीने आपल्या कुटुंबासोबत जेवण केले. मग सर्वजण झोपी गेले. कुटुंबीय हॉलमध्ये झोपले होते, तर मुलगी बेडरुममध्ये झोपली होती. यादरम्यान रात्रीच्या वेळी सर्व झोपेत असताना सोलकर मुलीच्या घरामध्ये शिरला. यानंतर त्याने मुलीची गळा आवळून हत्या केली आणि निघून गेला.

सकाळी मुलगी उशिरापर्यंत उठली नाही. काही वेळाने पोलीस घरी आले आणि म्हणाले मुलीची हत्या झाली आहे. यानंतर कुटुंबीयांसह पोलिसांनी बेडरुममध्ये जाऊन पाहिले असता, मुलीचा मृतदेह बेडवर आढळला. सर्व प्रकार पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.

अशी उघड झाली हत्या?

आरोपी सोलकरच्या वडिलांनीच सहार पोलिसांना हत्येची माहिती दिली. यानंतर पोलीस मुलीच्या घरी दाखल झाले आणि प्रकरणाची शहानिशा केली. हत्या केल्यानंतर आरोपीने स्मशानात जाऊन स्वतःला संपवण्याचाही प्रयत्न केला. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी स्मशानात जाऊन आरोपीला अटक केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;