राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांचे राजकीय उत्तर
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गोडवे गायले. मोदींवर स्तुतीसुमने उधळली. मोदींनी रशिया-युक्रेन युद्ध दोन तासांसाठी थांबवले असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच सभागृहात विरोधकांनी एकच कल्ला केला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे एक तास भाषण केले. या भाषणात त्यांनी बहुतांश वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींसाठी निधी कसा उभारणार याचे ठोस उत्तर देण्याऐवजी इच्छा असेल तर मार्ग दिसेल असे सांगितले.
मोदींनी युद्ध थांबवले
रशिया व युव्रेनमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना देशात परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन तासांसाठी युद्ध थांबवले असे एकनाथ शिंदे यांनी सांगताच विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवली, पण तरीही मोदींचे गुणगान करणे त्यांनी थांबवले नाही. मोदींनी 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढले असे सांगताच विरोधकांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.
वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ
सरकारने रिक्षा-टॅक्सी महामंडळ जाहीर केले आहे. त्याच धर्तीवर वृत्तपत्र विव्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List