‘संघर्षयोद्धा’नंतर रोहन पाटीलचा नवा सिनेमा; ‘राजाराणी’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

‘संघर्षयोद्धा’नंतर रोहन पाटीलचा नवा सिनेमा; ‘राजाराणी’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

ग्रामीण पार्श्वभूमीवरील थरारक प्रेमकहाणी असलेला ‘राजाराणी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नव्या दमाच्या आणि अनुभवी कलाकारांचं मिश्रण असलेल्या या चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर लालबागच्या राजाच्या चरणी सोमवारी लाँच करण्यात आलं आहे. 20 सप्टेंबर 2024 पासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘संघर्षयोद्धा’ या सिनेमानंतर अभिनेता रोहन पाटील याचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘राजाराणी’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज

‘राजाराणी’ चित्रपटाची थरारक प्रेमकहाणी 20 सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोडी ‘राजाराणी’ चित्रपटात झळकणार आहे. लालबागच्या राजाच्या चरणी राजाराणी चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. ‘एक थरारक प्रेमकथा’ अशी या सिनेमाची टॅग लाईन आहे. या सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohan Patil (@actor_rohan_patil_1112)

सिनेमाची गोष्ट काय?

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या अनेक प्रेमकथा आजवर अनेक चित्रपटांतून दाखवल्या गेल्या आहेत. मात्र प्रत्येक कथेचं काही ना काही वेगळेपण होतं. ‘राजाराणी’ या चित्रपटाच्या पोस्टरवर आग लागलेल्या परिस्थितीत एक तरुण-तरुणी एकमेकांचा हात धरुन असल्याचं दिसतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात इतकं काय थरारक घडलं असेल याची उत्सुकता या पोस्टरमुळे वाढली आहे.

‘एक थरारक प्रेमकहाणी’ अशी टॅगलाईन लिहिलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सकस कथा, उत्तम कलाकार असलेला ‘राजाराणी’ आता मोठ्या पडद्यावर येण्याची वाट पहावी लागणार आहे.

सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत राजाराणी या चित्रपटाची कथा , पटकथा , संवाद , गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे , हर्षवर्धन वावरे , अनविसा दत्तगुप्ता , नागेश मोरवेकर हे आहेत तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी हे आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;