मोठी दुर्घटना, हाथरसमध्ये चेंगराचेंगरीत जवळपास 100 हून अधिक भाविकांचा मृत्यू
उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना घडली आहे. हाथरसमध्ये चेंगराचेंगरी होऊन 100 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अनेक लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरु होता यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील रतिभानपूर येथे ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. या सत्संगाचा समारोप कार्यक्रम सुरु होता. यावेळी ही दुर्घटना घडली आहे.
उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत घोषित केली आहे. जखमींवर वेगवेगळ्या रुग्ण्लायता उपचार सुरु आहेत आणि महत्वाचे म्हणजे या दुर्घटनेतील मृतांची अधिकृत संख्या अद्याप राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List