नगर-मनमाड रस्त्यासंदर्भात नीलेश लंके यांनी घेतली नितीन गडकरींची भेट; समस्या मांडल्या

नगर-मनमाड रस्त्यासंदर्भात नीलेश लंके यांनी घेतली नितीन गडकरींची भेट; समस्या मांडल्या

बहुचर्चीत नगर-मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या दुरूस्तीसंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मंगळवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. या रस्त्याच्या रखडलेल्या कामासंदर्भात गडकरी यांनी पुढील आठवडयात रस्ते वाहतूक मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलविण्यात आल्याचे लंके यांनी सांगितले.

नगर-मनमाड तसेच नगर-पाथर्डी या दोन्ही रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्यांची दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी लंके यांनी मागील वर्षी उपोषण केले होते. त्यावेळी महाविकास आघाडीचे तत्कालीन नेते अजित पवार यांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी नगर येथे येत शिष्टाई करीत हे आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले होते. त्यावेळी पवार यांनी थेट नितीन गडकरी यांच्याशी संपर्क करून लंके यांच्या या आंदोलनात तोडगा काढला होता. गडकरी यांनी पवार यांच्यासह लंके यांच्याशी चर्चा करून विशेषतः नगर-पाथर्डी रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची ग्वाही दिली होती. हे लगेच सुरू होऊन पुर्णही झाले होते. नगर-मनमाड रस्त्याचेही काम सुरू झाले. मात्र ते पुन्हा थंडावल्याने नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुरी मतदारसंघात नगर-मनमाड रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. लंके यांच्याकडूनही या रस्त्याच्या दुरावस्थेस तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे जबाबदार असून त्यांच्या घराकडे जाणारा रस्त्याही त्यांना करता आला नसल्याची टीका त्यांनी केली होती. नीलेश लंके हे संसदेमध्ये शपथ घेण्यासाठी गेले होते, त्यावेळीही नितीन गडकरी यांची संसदेच्या आवारात त्यांची भेट झाली होती. त्याच वेळी लंके यांनी नगर-मनमाड रस्त्याच्या कामाविषयी गडकरी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी गडकरी यांनी कार्यालयात येऊन त्यासंदर्भात निवेदन देण्याबाबत सुचित केले होते.

गडकरी यांच्या सुचनेप्रमाणे लंके यांनी नगर-मनमाड रस्त्यासंदर्भात त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. या रस्त्यावर शेकडो प्रवाशांचे बळी गेले असल्याचे लंके यांनी मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. याच मार्गाने शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातील भाविक जात असतात. या भाविकांनाही खराब रस्त्यामुळे मनःस्ताप सहन करावा लागत असल्याचेही लंके यांनी गडकरी यांना सांगितले. त्यावर गडकरी यांनी पुढील आठवडयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या. या बैठकीस खा. लंके हे देखील उपस्थित राहणार आहेत.

एका सामान्य कुटूंबातून संसदेत आलेल्या खा. नीलेश लंके यांना त्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी माझी नेहमी मदत राहील अशी ग्वाही मंत्री गडकरी यांनी यावेळी बोलताना दिली. माझ्या खात्याअंतर्गत येणाऱ्या कामाचे प्रस्ताव सादर करा, त्यास प्राधान्याने मंजुरी देण्याची ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;