‘हा’ अभिनेता साकारणार सौमित्रची भूमिका; ‘सुख कळले’ मालिका रंजक वळणावर

‘हा’ अभिनेता साकारणार सौमित्रची भूमिका; ‘सुख कळले’ मालिका रंजक वळणावर

कलर्स मराठीवरील ‘सुख कळले’ ही लोकप्रिय मालिका आता रंजक वळणावर आली आहे. माधवच्या आकस्मिक निधनाने मिथिला कोलमडलीय, खरी पण आपल्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलल्याशिवाय गत्यंतर नाही. हे तिला माहिती आहे. अनेक आव्हानं आता तिच्यासमोर आहेत. पण मिथिलाला आता खंबीर व्हावेच लागणार आहे. एकीकडे आपल्या दुःखाचा सामना करत ती कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी आता तिला घराबाहेर पडावं लागणार आहे. अशातच या मालिकेत सौमित्रची एन्ट्री झाली आहे. अभिनेता आशय कुलकर्णी सौमित्रच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सौमित्रच्या येण्याने मालिकेत नवीन रंजक वळण येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे.

मिथिलाच्या आयुष्याला नवं वळण

10 वर्षे गृहिणीची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता मिथिला आयुष्याच्या या कसोटीच्या काळात पुन्हा नव्याने कामावर रूजू होण्यासाठी सज्ज होणार आहे. तर दुसरीकडे बाईने घरच सांभाळावं, तिनं कामासाठी बाहेर पडू नये, अशी विमल आत्याची विचारसरणी असल्याने मिथिलाला सगळ्या कसोट्यांवर परिस्थितींचा सामना करावा लागणार आहे.

सौमित्रच्या येण्याने मालिकेत नवा ट्विस्ट

‘सुख कळले’ मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. यात सौमित्रच्या येण्यामुळे मालिकेत एक नवं वळण आलं आहे. सौमित्रचे साधेपण, मनमिळावू स्वभाव आणि मदतीची वृत्ती मिथिलाच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे दिसून येत आहे. सौमित्रला कवितांचा शौक आहे आणि त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचा खरेपणा आहे. ज्यामुळे तो प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करेल.

हसमुख, मदत करणारा आणि इतरांच्या भावना समजून घेणारा सौमित्रचा स्वभाव आहे. पैशापेक्षा संबंधांना अधिक महत्त्व देणाऱ्या सौमित्रच्या व्यक्तिमत्त्वामुळे कथा आणखी रंगतदार होईल. आशय कुलकर्णीने साकारलेली सौमित्रची भूमिका प्रेक्षकांचे मन जिंकण्यास यशस्वी ठरेल का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

‘सुख कळले’ मालिकेत पुढे काय घडणार? याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली आहे. सौमित्रच्या प्रवेशाने मालिकेत नवी उर्जा आणि नवे वळण आलं आहे. अभिनेता आशय कुलकर्णी साकारत असलेल्या सौमित्रची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करेल का? हे येत्या काळात समोर येईल. मात्र सध्या सौमित्रच्या येण्याने मालिकेला नवं वळण आलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;