नगरमध्ये हॉटेल व्यवस्थापकास शिवीगाळ,ठार मारण्याची धमकी; सचिन कोतकरसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

नगरमध्ये हॉटेल व्यवस्थापकास शिवीगाळ,ठार मारण्याची धमकी; सचिन कोतकरसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

नगर येथील हॉटेल यश पॅलेसच्या व्यवस्थापकाला रस्त्यात गाठून दमदाटी करून मारहाण केल्याची घटना घडल्यामुळे शहरांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये गुंडाराज सुरू झाल्याची चर्चा होत आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये सचिन कोतकरसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन कोतकरसह हॉटेल उदयनराजे पॅलेस येथील रोशनकुमार मिश्र उर्फ राजन कुमार, प्रिन्स कुमार सिंग , निरज कुमार , अमन श्रीकांत सिंग , सुनिल कुमार सिंग , हनुमान रामदास झरेकर आणि इतर 4 ते 5 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राकेशकुमार रामनारायण सिंग (वय 45, मॅनेजर,यश पॅलेस) यांनी तक्रार दाखल केली आहे.

नगर शहरांमध्ये सक्कर चौक या परिसरामध्ये हॉटेल यश पॅलेस व उदयनराजे पॅलेस अशी दोन मोठे हॉटेल समोरासमोर आहेत. हॉटेल यश पॅलेस या ठिकाणी सध्या राकेश कुमार हे व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे. पूर्वी ते उदयनराजे या हॉटेलमध्ये काम करत होते. उदयनराजे हे भानुदास कोतकर यांच्या अधिपत्याखाली या हॉटेलचा कारभार सध्या सचिन कोतकर पाहात आहेत. या ठिकाणी काम करणारे राकेश कुमार यांना याआधीही दमदाटी करण्यात आली होती. यश पॅलेस हॉटेलमध्ये काम करू नको, असा दम त्यांना दिला होता. 2021 मध्ये राकेशकुमार यश पॅलेस येथे नोकरीला आले. तेव्हापासून हॉटेल उदयनराजे पॅलेसचे मालक सचिन कोतकर त्यांना दम देत आमच्यासमोरच्या हॉटेल यश पॅलेसमध्ये काम करु नको. तू इतर कोठेही काम कर, असे म्हणत मला दमदाटी करत असत, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणानंतर पोलीस अधिक्षक कार्यालय नगर येथे तक्रार अर्ज दिला होता.

यश पॅलेस हॉटेल येथील कर्मचारी पिंटू विनोद सिंग याला हॉटेल उदयनराजे पॅलेस येथील रोशन कुमार मिश्रा व त्याचे साथीदारांनी विनाकारण मारहाण केली होती. त्यावेळी पिंटू विनोद सिंग याने तक्रार दिली होती. त्यानंतर वेळोवेळी उदयनराजे पॅलेस येथील सुरज आप्पासाहेब शेळके, गणेश पांडुरंग सातपुते , सचिन पांडुरंग सातपुते यांना सचिन कोतकर हे माझ्याकडे पाठवत होते आणि धमकावत होते. सोमवारी रात्री राकेश कुमार यांना उदयनराजे पॅलेस हॉटेल येथील प्रिन्स याने फोन करत आपल्याला शिवीगाळ केली होती. त्यानंतर राकेश कुमार हे हॉटेल यश पॅलेस बंद करून घरी जात असतांना रात्री 12.50 वाजण्याच्या सुमारास हॉटेल यश पॅलेस समोर, शक्कर चौक, नगर येथे सचिन कोतकर आणि त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ करत तू यश पॅलेस हॉटेल येथे काम करु नकोस, तू येथून कोठेही जा, असा दम दिला. असे केले नाही तर तुला नगरमध्ये राहू देणार नाही. तुला जिवंत ठेवणार नाही, असे धमकावत ठार करण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हॉटेल यश पॅलेसचे संचालक योगीराज गाडे हे तात्काळ हे या ठिकाणी आले. त्यानंतर येथील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये सचिन कोतकरसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;