रत्नागिरीत बी टेकच्या परीक्षेत सावळा गोंधळ, सखोल चौकशी करा; युवासेनेची मागणी

रत्नागिरीत बी टेकच्या परीक्षेत सावळा गोंधळ, सखोल चौकशी करा; युवासेनेची मागणी

रत्नागिरीतील बी टेक कॉलेजमधील दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांचा सोमवारी वैश्विक मानवी मुल्य या विषयाचा पेपर होता. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील गोंधळामुळे एका तासातच प्रश्नपत्रिका बदलण्याची वेळ प्रशासनावर आली. विद्यापीठाने कळवल्यामुळे पेपर बदलत असल्याचे सांगण्यात आले. एक तासाने पुन्हा पेपर सोडवण्यास दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी युवासेनेचे रत्नागिरी तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी करत या प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे.

रत्नागिरीतील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शैक्षणिक सत्रातील अखेरची परीक्षा सुरु आहे. वैश्विक मानवी मुल्य या विषयाचा पेपर सोमवारी दुपारी दोन वाजता होता. एक तासानंतर तो काढून घेण्यात आला. अचानक पेपर काढून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. प्राध्यापकांनी विद्यापीठाकडूनच सूचना आल्याचे सांगत पुन्हा पेपर द्या, असे सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांना दुसरा पेपर देऊन तीन तासांचा वेळ देण्यात आला. त्यामुळे पाच वाजता संपणारा पेपर सायंकाळी साडेसहा वाजता संपला. पहिला पेपर विद्यार्थ्यांनी एक तास सोडवला. विद्यार्थ्यांची ती मेहनत वाया गेली. ही घटना समजताच युवासेनेचे रत्नागिरी तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी प्राचार्य यू.व्ही.पाटील यांची भेट घेत सखोल चौकशीची मागणी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;