तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, अखिलेश यादव यांचा हल्लाबोल

तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, अखिलेश यादव यांचा हल्लाबोल

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये फक्त एक पेपर लीक झालेला नाही. तर आतापर्यंत जेवढ्या परिक्षा झाल्या तेवढे पेपर लीक झाले आहेत. देशात सर्वांत महत्त्वाच्या परिक्षांचे देखील पेपर लीक झाले. परंतु, परिक्षांचे पेपर लीक कसे होत आहेत? तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा नाही आणि युवकांचं भविष्य उज्ज्वल करायचे नाही यासाठी मोदी सरकार पेपर लीक करतंय, असा गंभीर आरोप समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवर केला. लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषावर केलेल्या भाषणात त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करत विविध विषयांवर भाष्य केलं.

गेल्या दहा वर्षांत शिक्षण क्षेत्रात माफियांचा जन्म झाला आहे. यांनी भविष्यातील युवकांच्या आकांक्षाना विष दिले आहे. सरकार हे निराशाचे प्रतीक नाही तर आशेचे प्रतीक असले पाहिजे. जनता आता तुमच्या भुलथापांना बळी पडणार नाही. पुढच्या महिन्यात होणाऱ्या परिक्षांचे पेपर लीक न होण्याची सरकार गॅरंटी देणार का? असा सवालही यावेळी अखिलेश यादव यांनी केला.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपची दोन वेळा सत्ता आली. त्याच उत्तर प्रदेशसोबत किती भेदभाव करण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये जे महामार्ग तयार होत आहेत, ते राज्याच्या तिजोरीतला पैसा वापरून तयार केले जातायत. दिल्लीमधून अद्याप एकही राष्ट्रीय महामार्ग देण्यात आलेला नाही. तसेच, अखिलेश यादव ईव्हीएमवर बोलताना म्हणाले की, माझा आजही व उद्याही ईव्हीएमवर विश्वास नाही. जरी मी 80 जागा जिंकलो, तरी ईव्हीएमवर विश्वास ठेवणार नाही. मी ईव्हीएमने जिंकून ईव्हीएम हटविण्यासाठी प्रयत्न करणार. जोपर्यंत ईव्हीएमचा मुद्दा मार्गी लागत नाही. तोपर्यंत समाजवादी लोकं सरकारला जाब विचारत राहणार, असे अखिलेश यादव म्हणाले.

”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही गावे दत्तक घेतली होती. देशाच्या पंतप्रधानांनी एखादे गाव दत्तक घेऊनही जर त्या गावाचा कायापालट होत नसेल तर पुढील दहा वर्षांत ही गावाची प्रगती होणार नाही. मोदी सरकारने फक्त गावांची जाहिरातबाजी केली. परंतु, गावे जशी होती तशीच आहेत. ज्यांना दत्तक घेतले जाते, त्यांना अनाथ करून सोडून देणे ही चांगली गोष्ट नाही, असाही आरोप अखिलेश यादव यांनी सरकारवर केला.

लोकसभेत अखिलेश यादव यांनी अग्निवीर योजनेवरही टीका केली. ”सरकारने तरुणांना नोकऱ्यांपासून दूर ठेवले आहे. युवकांकडून रोजगार हिसकावून घेण्याचे काम सरकार करत आहे. आरक्षणाचा एवढा खेळ कोणत्याही सरकारने केला नव्हता, जेवढा या सरकारने केला आहे. सरकारला नोकऱ्या द्यायच्या नाहीत. त्यामुळे त्यांनी आरक्षणाचा खेळ केलाय. म्हणूनच लोकांना आरक्षणाचा हक्क मिळवून दिला जात नाही, असे लोकसभेत बोलताना अखिलेश यादव म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;