महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीनं दीपिका पादुकोणला टाकलं मागे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर जोशी यांची नात सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. एका चित्रपटामुळे तिला ही लोकप्रियता मिळाली आहे. मनोहर जोशींच्या नातीचं नाव आहे शर्वरी वाघ. 'मुंज्या' या चित्रपटात तिने बेलाची भूमिका साकारली होती.
शर्वरीने अवघ्या काही दिवसांत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणला मागे टाकलं आहे. दीपिकाला धोबीपछाड करत ती या आठवड्यात आयएमडीबीच्या (IMDb) सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.
फिल्म इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी प्रत्येक यश हे आणखी चांगले प्रोजेक्ट्स आणि चांगल्या भूमिका शोधण्यासाठी सक्षम करते," अशी प्रतिक्रिया शर्वरीने दिली आहे. शर्वरीचा 'मुंज्या' हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List