हिना खान कायम बॅगेत ठेवते ‘ही’ खास गोष्ट, जाणून तुम्हीही व्हाल अवाक्

हिना खान कायम बॅगेत ठेवते ‘ही’ खास गोष्ट, जाणून तुम्हीही व्हाल अवाक्

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री हिना खान हिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. फार कमी कालावधीत अभिनेत्री टीव्ही विश्वावर आणि चाहत्यांच्या मनावर ताबा मिळवला. पण काही दिवसांपूर्वी हिनाने चाहत्यांसोबत धक्कादायक बातमी शेअर केली. तिसऱ्या टप्प्यातील कॅन्सर झाल्याची माहिती खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ज्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला असून चिंता देखील व्यक्त केली. अशात, हिनाबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सांगायचं झालं तर, हिनाने अभिनेत्री होण्याचं स्वप्न कधी पाहिलंच नव्हत. हिना नशिबामुळे अभिनेत्री झाली. हिना मुंबई आली होती एयर – होस्टेस म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी. पण त्यादरम्यान तिला मलेरिया झाला आणि एअर होस्टेस ट्रेनिंग ॲकॅडमीमध्ये हिना जाऊ शकली नाही.

हिना हिचे स्वप्न वेगळे होते. पण तिच्या नशिबाला काही हटके मान्य होतं. अभिनय विश्वात करियर करायचं नसल्यामुळे हिना हिने त्यासाठी कधी प्रयत्न देखील केले नाहीत. एकदा हिना तिच्या मित्रांसोबत ’ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या ऑडिशनसाठी पोहोचली.

ऑडिशन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिना हिला मुख्य भूमिकेसाठी निर्मात्यांचा फोन आला. तेव्हा अभिनेत्री खूप आनंदी होती आणि हिनाने ऑफर स्वीकारली. हिनाच्या वडिलांना मुलीने मालिकेत काम करणं मान्य नव्हतं. पण हिना आनंदी असल्यामुळे त्यांनी देखील होकार दिला आणि हिना टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री झाली.

हिना बॅगेत कायम ठेवत खास गोष्ट

हिनाच्या बॅगेत अनेक गोष्टी असतात. पण त्यामध्ये एक खास गोष्ट आहे, जी अभिनेत्री कधीच विसरत नाही. हिना बॅगेत कायम एक ताबीज ठेवते. हिनाच्या बॅगेत कायम एक ताबीज असतो. हिनाची धर्मावरची गाढ श्रद्धा आहे की त्याच्याशी संबंधित काही अंधश्रद्धा, हे फक्त अभिनेत्रीलाच माहीत. पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे हिनाचा देवावर खूप विश्वास आहे.
हिना खान हिच्या मालिका

हिना खान हिच्या मालिकांबद्दल सांगायचं झालं तर, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमुळे हिनाच्या आयुष्यात मोठे बदल झाले. चाहत्यांनी देखील हिनाला भरभरुन प्रेम दिलं. त्यानंतर ‘कसौटी जिन्दगी की 2 ‘ मालिकेमुळे हिनाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिन्दगी की 2’ मालिकेशिवाय हिनाने अनेक मालिकांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील बजावली. ‘चांद छुपा बादल में’ आणि ‘सपना बाबुल का’ मालिकेत देखील हिना दिसली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;