केळवली धबधब्यात युवक बुडाला

केळवली धबधब्यात युवक बुडाला

कराड तालुक्यातील सैदापूर येथून मित्रांसोबत धबधबा पाहायला आलेला युवक सातारा तालुक्यातील दुर्गम परळी खोऱ्यात असलेल्या केळवली धबधब्यात बुडाल्याची घटना घडली. त्याला शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ऋषिकेश रमेश कांबळे (रा. सैदापूर, ता. कराड) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. सातारा तालुक्याच्या पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे अनेक धबधब्यांवर पावसाळी पर्यटनाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले साताऱ्यातील ठोसेघर, केळवली, भांबवली व जावळीतील धबधब्यांकडे कळू लागली आहेत.

परळी खोऱ्यातील केळवली धबधबा पाहण्यासाठी ऋषिकेश मित्रांसोबत आला होता. धबधब्याला मोठे पाणी असल्याने ऋषिकेश आणि त्याच्या मित्रांना पोहण्याचा मोह आवरला नाही. धबधबा परिसरात पोहत असताना ऋषिकेशला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. पोहत असताना ऋषिकेश मित्रांना दिसत नसल्याने मित्रांनी आरडाओरडा केला. या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतल्यानंतर ऋषिकेशचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र, धबधब्याच्या पाण्याचा मोठा प्रवाह आणि पावसाची रिपरिप यांमुळे शोधकार्यात अडचण येत होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;