TMKOC: नव्या टप्पूची फी ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का! भव्य गांधीपेक्षा दुप्पट मानधन

TMKOC: नव्या टप्पूची फी ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का! भव्य गांधीपेक्षा दुप्पट मानधन

गेल्या 15 वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेनं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. इतक्या वर्षांत या मालिकेतील बऱ्याच कलाकारांची जागा नव्या कलाकारांनी घेतली आहे. मात्र तरीसुद्धा त्याची लोकप्रियता कमी झाली नाही. प्रत्येक नव्या कलाकाराचा प्रेक्षकांनी खुल्या मनाने स्वीकार केला. म्हणूनच 15 वर्षांपासून ही मालिका चांगली टीआरपी मिळतेय. काही दिवसांपूर्वीच टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता भव्य गांधीने या मालिकेचा निरोप घेतला होता. त्याच्या जागी नितीश भालुनी आता मालिकेत टप्पूची भूमिका साकारतोय. या भूमिकेसाठी त्याला तगडं मानधन मिळाल्याचं कळतंय. त्याची फी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. भव्य गांधीपेक्षाही अधिक मानधन नितीशला मिळतंय.

‘तारक मेहता..’ ही मालिका जेव्हापासून सुरू झाली, तेव्हापासून भव्य गांधी यामध्ये टप्पूची भूमिका साकारत होता. भव्यने 2008 पासून 2017 पर्यंत या मालिकेत काम केलं. त्यानंतर त्याने ही मालिका सोडली आणि चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्याचं ठरवलं. मिळालेल्या माहितीनुसार, भव्यला एका एपिसोडसाठी 10 हजार रुपये मानधन मिळायचं. भव्यने मालिका सोडल्यानंतर त्याची जागा राज अनाडकतने घेतली. राजला प्रत्येक एपिसोडसाठी 20 हजार रुपये मानधन मिळत होतं. भव्यपेक्षा राजची फी दुप्पट करण्यात आली होती. पाच वर्षांपर्यंत या मालिकेत काम केल्यानंतर त्यानेसुद्धा निरोप घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nitish Bhaluni (@nitishbhaluni8)

आता राज अनाडकतनंतर नितीश भालुनी मालिकेत टप्पूची भूमिका साकारतोय. नितीशलाही प्रत्येक एपिसोडसाठी 20 हजार रुपये मानधन मिळतंय. भव्य आणि राजप्रमाणेच नितीशलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. टप्पूच्या भूमिकेत ज्या ज्या कलाकाराने मालिकेत एण्ट्री केली, त्याला नेहमीच प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. त्यामुळे भव्य आणि राजनंतर आता नितीशचीही लोकप्रियता वाढू लागली आहे. आतापर्यंत या मालिकेतून दहापेक्षा अधिक कलाकारांनी निरोप घेतला आहे. मालिका सोडल्यानंतर काहीजण त्यांच्या संसारात रमले आहेत, तर काहीजण दुसऱ्या क्षेत्रात नाव कमवत आहेत. मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी अद्याप परतली नाही. तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागली नाही. यावरून अनेकदा प्रेक्षकांकडून प्रश्न विचारला जातो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;