‘धुरळा’च्या दिग्दर्शकाच्या लग्नाला पोहोचला कार्तिक आर्यन; लव्हस्टोरीचा होता साक्षीदार
'वायझेड', 'धुरळा', 'डबलसीट', 'आनंदी गोपाळ' यांसारख्या उत्तम चित्रपटांचे दिग्दर्शक समीर विद्वांस हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. गर्लफ्रेंड जुईली सोनलकरशी त्यांनी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला मराठी कलाकारांसोबत बॉलिवूड अभिनेतासुद्धा उपस्थित होता.
अभिनेता कार्तिक आर्यनसुद्धा समीरच्या लग्नाला उपस्थित होता. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो पोस्ट करत त्याने नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. कार्तिकच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
समीर विद्वांसने 'सत्यप्रेम की कथा' या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यामुळे कार्तिकलाही या लग्नाचं खास आमंत्रण होतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List