Bigg Boss OTT 3: पहिल्या पत्नीसोबत होणार अरमानचा घटस्फोट? पायल म्हणाली, ‘माझ्याकडे बक्कळ पैसा आहे म्हणून…’

Bigg Boss OTT 3: पहिल्या पत्नीसोबत होणार अरमानचा घटस्फोट? पायल म्हणाली, ‘माझ्याकडे बक्कळ पैसा आहे म्हणून…’

युट्यूबर पायल मलिक आता ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोमधून बाहेर आली आहे. पहिल्याच आठवड्यात पायल हिचा ‘बिग बॉस’मधील प्रवास संपला आहे. सध्या पायल तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पायल हिचा पती युट्यूबर अरमान मलिक याने पायल हिला घटस्फोट न देता कृतिका हिच्यासोबत लग्न केलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे पायल आणि कृतिका एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. त्यामुळे अरमान – कृतिका यांच्यामध्ये देखील चांगली मैत्री झाली. पण जेव्हा अरमान – कृतिका यांनी लग्न केलं तेव्हा पायल हिला मोठा धक्का बसला. अशात चाहत्यांमध्ये पायल आता अरमानला घटस्फोट देणार का? अनेकांनी तर पायल हिने आता विभक्त व्हायला हवं… असा देखील सल्ला तिला दिला.

पायल हिने अरमानला घटस्फोट देत स्वतःची भक्कम ओळख तयार करण्याची गरज आहे. पायल हिने मुलांसोबत व्लॉगिंगच्या विश्वात पाऊल ठेवायला हवं असं देखील अनेक जण बोलत आहेत. सांगायचं झालं तर, पायल हिला याबद्दल विचारण्यात देखील आलं. यावर पायल म्हणाली, ‘मी कधीच अरमानला घटस्फोट देणार नाही…’ तिने यामागचं कारण देखील सांगितलं.

पायल म्हणाली, ‘घटस्फोट कधीच होणार नाही कारण मला नाही वाटतं की अरमान कधी माझ्यात आणि कृतिकामध्ये फरक करतो. किंवा माझ्यावर जास्त आणि कृतिकावर कमी प्रेम करतो. अरमानसाठी आम्ही दोघी आणि आमची चार मुलं समान आहेत. माझ्या डोक्यात देखील कधी घटस्फोटाचे विचार येणार नाहीत. मला कितीही प्रसिद्धी मिळाली… माझ्याकडे बक्कळ पैसा आली तरी देखील मी विभक्त होणार नाही.’

‘मला माहिती आहे की, मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. माझ्याकडे आज इतका पैसा आहे की, मी वेगळी निघाली तरी, पैसा कमावू शकते. पण मला त्या दिशेना जायच नाही. मी माझ्या कुटुंबासोबत आणि मुलांसोबत आनंदी आहे. मी अरमानवर खूप प्रेम करते…’ एवढंच नाही तर, ‘बिग बॉस’ने पुन्हा बोलावलं जाईल… असं देखील पायल म्हणाली.

पायल मलिक हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पायल कायम सोशल मीडियावर स्वतःचे आणि कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील पायल हिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;