ऐकावं ते नवलच! मला प्रियकरासोबत राहायचंय, खर्च नवऱ्यानं करावा

ऐकावं ते नवलच! मला प्रियकरासोबत राहायचंय, खर्च नवऱ्यानं करावा

मला माझ्या प्रियकरासोबत राहायचे आहे, परंतु घरखर्च नवऱ्याने करावा, अशी विचित्र मागणी पत्नीने केल्याने नवरा चक्रावून गेला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडली आहे. नवराबायकोचे हे प्रकरण सध्या कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचले आहे. महिलेने समुपदेशकासमोर ही गोष्ट सांगितल्याने सर्वच हैराण झाले आहेत.

माझा आणि दोन्ही मुलींचा खर्च नवऱ्याने करावा. कारण या दोन्ही मुली मला नवऱ्यापासून झाल्या आहेत. त्यामुळे खर्चाची जबाबदारी नवऱ्याची आहे, असे पत्नीने म्हटले आहे, तर जर पत्नी माझ्यासोबत राहत नसेल तर मी तिचा आणि तिच्या मुलीचा खर्च का उचलू? असे नवऱ्याचे म्हणणे आहे. तिला तिच्या प्रियकरासोबत राहायचे आहे तर तिने तिचा खर्च स्वतः करावा, असेही नवऱ्याचे म्हणणे आहे. नवरा मला वेळ देत नसल्याने प्रियकराने आधार दिला, असे पत्नीने म्हटले. या दोघांच्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;