हिंदुस्थानकडे जगातील सर्वात शक्तिशाली स्फोटक
हिंदुस्थानने जगातील सर्वात शक्तीशाली स्फोटक तयार केले आहे. हे स्फोटक ट्रायनिट्रोटोल्युएन ( टीएनटी) पेक्षा दुप्पट घातक आहे. त्याला ‘सेबेक्स-2’ असे नाव देण्यात आलेय. सर्वात घातक अशा नॉन न्यूक्लिअर स्फोटकांपैकी एक आहे. यामुळे हिंदस्थानची ताकद आणखी वाढली आहे. नौदलाने ‘सेबेक्स-2’ चे यशस्वी चाचणी घेतली आहे. स्फोटकांची तीव्रता ‘टीएनटी’वरून मोजली जाते. ‘टीएनटी’ हे असे प्रमाण आहे, ज्याच्यावरून स्फोटक किती विध्वसंक ठरू शकतो. या प्रमाणात पाहिले तर ‘सेबेक्स-2’ हे दुपटीहून अधिक विनाशकारी आहे.
सध्या हिंदुस्थानच्या नॉन न्यूक्लिअर ब्रह्मोस क्षेपणास्त्रामध्ये सर्वात घातक विस्फोटक वापरले जाते. ज्याची टीएनटी समतुल्यता 1.50 आहे. जगातील बहुतेक वॉरहेड्समध्ये 1.25-1.30 दरम्यान टीएनटी समतुल्यता असते. सेबेक्स 2 मध्ये टीएनटी समतुल्य 2.01 आहे. म्हणजे आतापर्यंतचे सर्वात घातक स्फोटक आहे.
सेबेक्स 2 बनवणारी कंपनी आणखी एका स्फोटकावर काम करत आहे. ते स्फोटक टीएनटी पेक्षा 2.3 पट जास्त घातक असेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List