फोक्सवॅगन हिंदुस्थानातून लवकरच गाशा गुंडाळणार
जर्मनीची आघाडीची ऑटो कंपनी फोक्सवॅगन हिंदुस्थानातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे. कंपनी सध्या हिंदुस्थानातील आपला हिस्सा स्थानिक कंपनीला विकण्यासाठी बोलणी करत आहे. हिंदुस्थानात दोन अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक करूनही फोक्सवॅगन कंपनीला बाजारपेठेत स्थान मिळवण्यात अपयश आले आहे.
बाजारातील हिस्सा वाढवण्यासाठी कंपनी नवीन परवडणाऱ्या कार विकसित करत आहे. कंपनीने आतापर्यंत महागडी युरोपियन वाहने देशात लाँच केली आहेत. परंतु, ही वाहने ग्राहकांच्या पसंतीस उतरली नाहीत. देशातील हायब्रिड वाहनांवरील कराचे दर कमी करण्यात यावे, अशी मागणीही समूहाने केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List