काँग्रेसकडून डॉ. प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर
विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसने डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. सातव यांच्या उमेदवारीची घोषणा आज नवी दिल्लीतून करण्यात आली. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेऊन काँग्रेसने विधान परिषदेला एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी नोव्हेंबर 2021 मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत काँग्रेसने डॉ. सातव यांना पहिल्यांदा उमेदवारी दिली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List